हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 12 टक्के वाढ
एनसीआरबीचा अहवाल : कोरोना महामारीनंतरच्या कालावधीतील आकडेवारी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एनसीआरबीच्या एका नव्या अहवालानुसार 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये हार्ट अटॅकमुळे (हृदयाघात) होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात 12.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2022 मध्ये हार्ट अटॅकमुळे 32,457 जणांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये नोंदविण्यात आलेल्या 28,413 मृत्यूंच्या तुलनेत हा आकडा अधिक असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. कोरोना महामारीनंतर पासून हृदयघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचा खुलासा अहवालात करण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे हृदयाच्या कार्यक्षमतेला अत्यंत अधिक प्रभावित केले असल्याचे अनेक जागतिक संशोधनांच्या निष्कर्षात नमूद आहे. आकडेवारीनुसार 2022 मध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. 2022 मध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंचे एकूण प्रमाण अत्यंत अधिक हैराण करणारे ठरले आहे. हा आकडा 56,450 राहिला असून तो मागील तीन वर्षांमधील चिंताजनक वाढ दर्शविणारा असल्याचे अवालात म्हटले गेले आहे.
का होतो हार्टअटॅक?
हृदयाघाताचे धोके वाढविणारे अनेक घटक असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. यात हाय सोडियम डायट, शारीरिक कसरतींचा अभाव, धूम्रपान, अत्याधिक मद्यपान, अधिक सक्रीय न राहणे इत्यादींचा समावेश आहे. आरोग्य तज्ञांनुसार हाय हीमोग्लोबिनची पातळी देखील हृदयघाताचा धोका वाढवते. पॉलिसिथेमियाची स्थिती मानवी आरोग्यासाठी धोकादायक असते. यात बोन मॅरोमध्ये असामान्यतेमुळे मानवी शरीरात लाल पेशी वाढत असतात. या अतिरिक्त पेशी रक्ताचा पातळपणा कमी करतात. तसेच याचा प्रवाह मंद करतात व रक्ताच्या गुठळ्या होण्यासारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. उच्च हीमोग्लोबिलनच्या पातळीकडे दुर्लक्ष केले जाऊ नये कारण रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढत असतो व कधीकधी स्ट्रोक, हृदयाघात इत्यादी धोकादायक स्थिती उदभवू शकते, असे तज्ञांचे सांगणे आहे.
आकड्यात मोठी वाढ
2022 मध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 56,450 वर पोहाचले आहे. तर 2021 साली हा आकडा 50,739 राहिला होता. याच्या तुलनेत 2022 मध्ये हा आकडा 10.1 टक्क्यांनी अधिक राहिला आहे. अचानक होणाऱ्या मृत्यूंविषयी ‘एनसीआरबी’ने स्वत:च्या अधिक माहिती दिली आहे. हार्ट अटॅक, ब्रेन स्टोकमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. 2020 मध्ये हा आकडा 28,579 राहिला होता. तर 2021 मध्ये हा आकडा कमी होत 28,413 वर पोहोचला होता. परंतु 2022 मध्ये हे प्रमाण पुन्हा वाढून 32,457 झाले होते.