For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयातील स्टीलवर 12 टक्के शुल्क

07:00 AM Jan 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयातील स्टीलवर 12 टक्के शुल्क
Advertisement

नवी दिल्ली : देशांतर्गत स्टील उत्पादकांच्या सुरक्षेसाठी भारताने आयातीत काही पोलाद उत्पादनांवर शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त स्टील आयातीला लगाम घालण्यासाठी सरकारने पुढील 3 वर्षासाठी शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल 2026 पर्यंत 12 टक्के शुल्क आकारले जाणार असून तयानंतर ते 11.5 टक्के, 11 टक्के असे आकारले जाणार असल्याचे समजते. एप्रिल 2025 ते एप्रिल 2026 पर्यंत ठराविक आयातीत पोलादावर 12 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. वाढत्या स्वस्त आयातील स्टीलला रोखण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. 21 एप्रिल 2026 ते 20 एप्रिल 2027 याकालावधीसाठी शुल्क 11.5 टक्के असणार असून 21 एप्रिल 2027 ते 20 एप्रिल 2028 कालावधीसाठी ते 11 टक्के आकारले जाणार आहे. विविध उद्योग, फॅब्रिकेशन, पाइपनिर्मिती, बांधकाम, ऑटो, ट्रॅक्टर्स, सायकल व इलेक्ट्रीकल पॅनेलकरीता भारतात स्वस्त पोलादाची बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणात होत होती. हे रोखण्यासाठी शुल्क आकारण्यात आले आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.