कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ड्रग ओव्हरडोजमुळे आठवड्याला 12 जणांचा मृत्यू

06:01 AM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एनसीआरबीच्या अहवालातून धक्कादायक सत्य समोर : दरदिनी 2 जणांचा होतोय मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशात सध्या अमली पदार्थांची समस्या विक्राळ होत चालली आहे. सीमावर्ती राज्यांसह आता देशातील जवळपास सर्वच ठिकाणी अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट कार्यरत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. ग्रामीण भागांमध्येही आता अमली पदार्थ सहजपणे उपलब्ध होऊ लागल्याने पोलिसांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर एनसीआरबीने नवी आकडेवारी जारी केली असून यात 2019-23 दरम्यान ड्रग ओव्हरडोसमुळे देशात झालेल्या मृत्यूंचा उल्लेख आहे. या अहवालानुसार ड्रग ओव्हरडोसमुळे दर आठवड्याला 12 जणांचा मृत्यू होत आहे.

नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) नुसार 2023 साली ड्रग ओव्हरडोजमुळे दर आठवड्याला 12 जणांना जीव गमवावा लागला आहे. 2019-2023 दरम्यान दरदिनी 2 जणांचा मृत्यू ड्रग ओव्हरडोजमुळे झाला आहे. परंतु या अहवालात केवळ ड्रग ओव्हरडोजमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी मिळालेल्या प्रकरणांचीच आकडेवारी आहे. ड्रग ओव्हरडोजशी निगडित अनेक प्रकरणांची नोंदची केली जात नाही, यामुळे ही आकडेवारी एनसीआरबीच्या अहवालात सामील नाही. अशास्थितीत ड्रग ओव्हरडोजमुळे दरदिनी जीव गमाविणाऱ्या लोकांची संख्या प्रत्यक्षात खूप अधिक असावी.

2019 मध्ये तामिळनाडू टॉपवर

ड्रग ओव्हरडोजच्या प्रारंभिक आकडेवारीत तामिळनाडूत सर्वाधिक बळींच नोंद झाली होती. परंतु आता राज्यात याची प्रकरणे कमी होऊ लागली आहेत. 2019 मध्ये तामिळनाडूत ड्रग ओव्हरडोजमुळे 108 जणांना जीव गमवावा लागला होता. परंतु 2023 मध्ये हा आकडा कमी होत 65 वर आला आहे. तर 2019 मध्ये पंजाबचे नाव पहिल्या 5 राज्यांमध्ये सामील नव्हते. परंतु 2022 मध्ये पंजाबमध्ये ड्रग ओव्हरडोजमुळे 144 जणांचा मृत्यू ओढवला आहे. 2023 मध्ये हा आकडा कमी होत 89 नोंदविला गेला आहे. परंतु पंजाबमधील हा आकडा प्रत्यक्षात याहून कित्येक पटीने अधिक असण्याची शक्यता आहे.

राजस्थानातही समस्या तीव्र

राजस्थानमध्ये ड्रग ओव्हरडोजमुळे 2019 साली 60 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2020 साली हा आकडा वाढून 92 वर पोहोचला. 2021 मध्ये हा आकडा आणखी वाढत 113 वर गेला आणि 2022 मध्ये तो 117 वर पोहोचला आहे. राजस्थान हे ड्रग ओव्हरडोजमुळे होणाऱ्या मृत्यूप्रकरणी नेहमीच पहिल्या राज्यांमध्ये सामील राहिले आहे.

अन्य राज्यांची स्थिती

मध्यप्रदेशात 2019 आणि 2022 साली ड्रग ओव्हरडोजची समस्या अधिक तीव्र नव्हती. परंतु 2021 साली राज्यात 34 मृत्यूंची नोंद झाली. 2022 मध्ये हा आकडा दुप्पटीने अधिक होत 74 वर पोहोचला आणि 2023 साली हा आकडा 85 झाला. यामुळे मध्यप्रदेश हे ड्रग ओव्हरडोजच्या सर्वाधिक बळींप्रकरणी दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. मिझोरममध्ये 2020 साली ड्रग ओव्हरडोजमुळे 30 तर 2022 साली 61 जणांना जीव गमवावा लागला. तर मणिपूरमध्ये 2021 साली 36 जणांचा मृत्यू झाला होता. कर्नाटक याप्रकरणी 2019 साली पहिल्या 5 राज्यांमध्ये 67 बळींसह सामील होते. तर 2020 मध्ये ही संख्या कमी होत 36 वर आली होती.

ड्रग ओव्हरडोजमुळे होणारे मृत्यू

वर्ष                          मृत्यू

2019                     704

2020                     514

2021                    737

2022                   681

2023                  654

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article