For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

12 नवी टेहळणी विमाने वायुदलात होणार सामील

06:29 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
12 नवी टेहळणी विमाने वायुदलात होणार सामील
Advertisement

300 डिग्रीपर्यंत होणार रडार कव्हरेज : सीमेवर देखरेख वाढविण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर हवाई देखरेख वाढविण्यासाठी 12 नवी टेहळणी विमाने तयार करण्याचा विचार केला जात आहे. ही विमाने एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (एईडब्ल्यूअँडसी) प्रकारातील असणार आहेत. या विमानांमुळे चीन आणि पाकिस्तानच्या विरोधातील मोहिमांमध्ये वायुदलाच्या लढाऊ विमानांना मदत होणार आहे.

Advertisement

डीआरडीओ आणि भारतीय वायुदल 6 एईडब्ल्यूअँडसी सिस्टीमने युक्त मार्क-1 विमाने तयार करणार आहे. याकरिता संरक्षण मंत्रालय येत्या काही दिवसात आवश्यक स्वीकृती पत्र देखील जारी करणार आहे. यानंतरच 6 एईडब्ल्यूअँडसी सिस्टीमने युक्त विमानांच्या निर्मितीचे कार्य सुरू होणार आहे.

मार्क-1 एईडब्ल्यूअँड सी विमानांची रेंज 240 डिग्री असणार आहे. तर मार्क-2 विमानाची रेंज 300 डिग्रीपर्यंत असणार आहे. मार्क-2 विमान 2026-27 पर्यंत वायुदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. भारताकडे टेहळणीसाठी यापूर्वीच 3 एईडब्ल्यूअँड सी विमाने असून त्यांना नेत्र विमान देखील म्हटले जाते. मार्क-1 हे विमान सक्रिय इलेक्ट्रॉनिक स्वरुपात एरे-एंटीना-आधारित रडार, इलेक्ट्रॉनिक आणि सिग्नल इंटेलिजेन्स सिस्टीमने युक्त असणार आहे. या प्रकल्पासाठी 9 हजार कोटी रुपयांचा खर्च होण्याचे अनुमान आहे.

नव्या विमानाची आवश्यकता

भारत सध्या पाकिस्तान आणि चीनच्या तुलनेत एईडब्ल्यूअँडसी प्रकरणी मागे पडत आहे. हवाई टेहळणीसाठी भारताकडे 3 नेत्र विमाने आहेत, याचबरोबर तीन रशियन आयएल-76 विमाने असून त्यावर इस्रायली फॅलकॉन एडब्ल्यूएसी सिस्टीम बसविण्यात आली आहे. या विमानांची रेंज 400 किलोमीटर असून त्यांचे रडार कव्हरेज 360 डिग्री आहे. या विमानांना 2009-10 मध्ये वायुदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले होते.

हवाई देखरेखीसाठी पाकिस्तानकडे सध्या 11 स्वीडिश एईडब्ल्यूअँड सी विमाने आणि एक चिनी काराकोरम ईगल एडब्ल्यूएसी विमान आहे. तर चीनकडे अशाप्रकारची 30 विमाने आहेत. टेहळणी करणाऱ्या विमानाची गरज फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट एअरस्ट्राइकदरम्यान वायुदलाला जाणवली होती. यानंतर पूर्व लडाखमध्ये चीनसोबत झालेल्या झटापटीनंतर देखील वायुदल त्या क्षेत्रातील देखरेख वाढवू इच्छिते.

Advertisement
Tags :

.