महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा

06:57 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विजापूरमधील संघर्षात 2 जवानही जखमी : गेल्या दहा दिवसात दुसरी मोठी चकमक

Advertisement

वृत्तसंस्था/जगदलपूर/विजापूर

Advertisement

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरून सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शस्त्रास्त्रे, बंदुका, नक्षली गणवेश, औषधे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत दोन एसटीएफ आणि डीआरजी जवानही जखमी झाले आहेत. दरम्यान, नक्षलवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या व्यापक मोहिमेत जानेवारीपासून आतापर्यंत गेल्या 131 दिवसात जवानांनी 103 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच मागील दहा दिवसातील ही दुसरी मोठी चकमक असल्याचे सुरक्षा प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या कारवाईबद्दल सुरक्षा दल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना शुक्रवारी मोठे यश मिळाले. या चकमकीत सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचे मुख्यमंत्री विष्णूदेव सहाय यांनीच जाहीर केले आहे. जिल्ह्यातील गंगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील पीडिया गावातील जंगलात ही चकमक झाली. या भागात कट्टर नक्षलवादी कमांडर लिंगा, पापाराव आणि इतर मोठे नेते उपस्थित असल्याची माहिती सैनिकांना मिळाली होती. नक्षलवाद्यांच्या या गटात अन्य पॅडरमधील बडे नक्षलवादीही असल्यामुळे सुरक्षा दलाने व्यापक रणनीती आखली.

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर गंगलूर स्टेशन परिसरात नक्षलविरोधी कारवाईसाठी सुरक्षा दल पाठवण्यात आले होते. हे पथक पीडिया गावाच्या जंगलात असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. शेजारच्या दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्ह्यातील एसटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनच्या 1,200 जवानांनी संयुक्त कारवाई केली. शुक्रवारी सकाळी जंगलात झालेल्या भीषण चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत. काहीजण पळून गेल्याचा संशय असून त्यांच्यावरही पाळत ठेवली जात आहे. बस्तरचे आयजी आणि डीआयजी यांच्यासह जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत.

10 दिवसांपूर्वीही 10 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये अलीकडच्या काळात पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात अनेक मोठ्या मोहीम राबवल्या आहेत. गेल्या 10 दिवसात राज्यातील ही दुसरी मोठी चकमक आहे. यापूर्वी 30 एप्रिल रोजी नारायणपूर येथे झालेल्या एन्काऊंटरमध्ये बस्तर पोलिसांना मोठे यश मिळाले होते. नक्षलवादी आणि जवानांमध्ये सुमारे 9 तास चाललेल्या चकमकीत जवानांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 3 महिला आणि 7 पुऊष नक्षलींचा समावेश होता. त्यापूर्वी 16 एप्रिल रोजी कांकेर जिह्यात सुरक्षा दलांनी तब्बल 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

मागील 131 दिवसात 103 नक्षलवादी ठार

चालू वर्षात आतापर्यंत 131 दिवसात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत 103 नक्षलवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात जनजागृती मोहीमही सुरू केली असून त्याचा परिणाम बस्तरसह संपूर्ण नक्षलग्रस्त भागात दिसून येत आहे. जनजागृतीमुळे पोलीस आणि सुरक्षा दल आता अंतर्गत भागात पोहोचून थेट कारवाई करत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article