For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांदा शहरासाठी १२ लाखाची कचरावाहक गाडी उपलब्ध

04:42 PM Nov 30, 2023 IST | अनुजा कुडतरकर
बांदा शहरासाठी १२ लाखाची कचरावाहक गाडी उपलब्ध
Advertisement

मंत्री केसरकरांच्या आमदार निधीतून नूतन कचरावाहक गाडी

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून बांदा शहरासाठी १२ लाख रुपये किमतीची कचरावाहक गाडी उपलब्ध झाली आहे. या गाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याची सुविधा आहे. शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी पत्रव्यवहार करत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

Advertisement

बांदा शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या बांदा ग्रामपंचायतकडे कचरा उचलण्याची मर्यादा येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीसाठी कचरा गाडी मिळावी अशी मागणी श्री काणेकर यांनी निवेदनाद्वारे मंत्री केसरकर यांच्याकडे जुलै २०२३ मध्ये केली होती. मंत्री केसरकर यांनी तात्काळ प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांना निधी मंजूर करण्यासाठी पत्र दिले. स्थानिक आमदार विकास निधीतून निधी मंजूर करत तात्काळ बांदा शहरासाठी कचरा गाडी उपलब्ध करून दिल्याने श्री काणेकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. लवकरच दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत कचरा गाडीचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे श्री काणेकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.