महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवशाही बस उलटून 12 जण ठार

01:33 PM Nov 30, 2024 IST | Pooja Marathe
12 killed as Shivshahi bus overturns
Advertisement

गोंदिया -कोहमारा मार्गावरील घटना

Advertisement

28 जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Advertisement

नागपूर

सध्या विदर्भात अपघात सत्र सुरूच आहे, दोन दिवसांपूर्वी शाळेची सहल घेवून जाणारी ट्रॅव्हल बस उलटल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी शिवशाही बस उलटून 12 प्रवासी ठार झाल्याची घटना दुपारी गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ घडली. या घटनेत 20 ते 25 प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येथे जात होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डव्वा जवळ बस उलटून जवळपास 20 फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे बसमधील 12 प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर 28 प्रवासी जखमी झाले आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच 108 ऊग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल होत मदत कार्याला सुरूवात केली.

मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख ऊपयांची मदत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोंदिया जिह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मफतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख ऊपयांची मदत देण्यात येईल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.  मुख्यमंत्री शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. -

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article