इंडियन कराटे क्लबच्या 12 कराटेपटूंना ब्लॅकबेल्ट
बेळगाव : येथील मिलेनियम गार्डन, गोवावेस टिळकवाडी येथे कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण 77 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते. त्यामध्ये इंडियन कराटे क्लबच्या 12 विद्यार्थ्यांना ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आले. ऋषिकेश अजय शहापूरकर, प्रगती राजु कमल, विरेन प्रवीण मांडरे, आयशा भुषण रेवणकर, मंथन अरविंद सुरुतेकर, अनुश्री शरण बेंबळगी, विवान सिद्धार्थ मिरजी, निवेदिता प्रमोद मेळळ्ळी, मिषबाहुद्दिन जैनोद्दिन खान, अन्विता राजाराम बाळेकुंद्री, प्रथमेश दिनेश फासलकर आणि श्वेता श्रीकांत नारायणकर यांना ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आले. हे सर्व बारा विद्यार्थी गेल्या 8 ते 12 वर्षांपासून हिंदवाडी येथील कराटे क्लासमध्ये सतत सराव करित होते. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली. या विद्यार्थ्यांना इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅकबेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच त्यांच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. वरील बारा ब्लॅकबेल्ट विद्यार्थ्यांना कराटे मास्टर गजेंद्र काकतीकर यांचे प्रशिक्षण लाभत आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदिवीर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पद्मराज पाटील, बेम्को हायड्रॉलिक मधील वरिष्ठ व्यवस्थापक आणि कारखाना व्यवस्थापक सतीश नाईक, जगज्योती बसवेश्वर कल्याण मंटपचे अध्यक्ष, दानम्मा देवस्थान शहापूर, बेळगावचे चंद्रशेखर बेंबळगी, सेंट जर्मन्स शाळेचे चेरमन उदय इडगल उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर, प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, निलेश गुरखा, विनायक दंडकर, नताशा अष्टेकर, कृष्णा देवगाडी, रतिक लाड, सौरभ मजुकर, वैभव कणबरकर, रोहीत चौगुले, सिध्दार्थ ताशिलदार, श्रेया यळ्ळूरकर, परशराम नेकनार, जयकुमार मिश्रा, वाचना देसाई, दिपीका भोजगार, अश्विनी तेलंग आणि संतोष तेलंग यांनी विशेष परिश्रम घेतले.