'डॉन-३' मध्ये व्हीलनची भूमिका साकारणार '१२ फेल' कलाकार
रणवीर सिंग यांना देणार तगडी टक्कर
मुंबई
२००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुख खानच्या डॉन सिनेमा बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला होता. या सिनेमाचा सिक्वेल डॉन ३ ची सध्या जोरदार चर्चा आहे. या सिनेमात रणवीर सिंग आणि कियार अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाची दिग्दर्शक अभिनेता फरहान अख्तरने अलिकडेच घोषणा केलेली आहे.
या सिनेमाशी निगडीत अजून एक बातमी समोर येत आहे. सिनेमाच्या व्हिलनचे कास्टींग फायनल झाले आहे. या नावाची चर्चाही सिनेसृष्टीत जोरदार सुरू आहे. मिडीया रिपोर्टनुसार, डॉन-३ या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता विक्रांत मेस्सी च्या नावाची विचारणा झाल्याचे कळत आहे. त्यामुळे रणवीर सिंग आणि विक्रांत मेस्सीला एका फ्रेममध्ये पहायला मिळाणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. परंतु अजून चित्रपटाचे निर्माते किंवा विक्रांत मेस्सी यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.