कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

11th Admission: ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ, कधीपर्यंत करु शकता अर्ज?

10:39 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य शासनाने नुकताच ईन हाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोटा यात बदल केला आहे

Advertisement

रत्नागिरी : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबवल्या जात असलेल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. परंतु आता सुधारित मुदतवाढीनुसार विद्यार्थी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

Advertisement

राज्यभरातील सुमारे दहा लाख 85 हजार 851 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिह्यांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. 26 मे पासून शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी सुरू आहे.

राज्य शासनाने नुकताच ईन हाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोटा यात बदल केला आहे. या बदलानुसार शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदत देणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोल्हापूर विभागात रत्नागिरी जिल्ह्dयातून 13,115 विद्यार्थ्यांचे प्रवेश नोंदणी पूर्ण झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia11th admissiononline admissionstate government
Next Article