महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अकरावीच्या वार्षिक परीक्षा आजपासून

11:11 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

1 मार्चपासून बारावी परीक्षांना प्रारंभ

Advertisement

बेळगाव : पीयुसी प्रथम वर्षाच्या परीक्षांना सोमवार दि. 12 पासून प्रारंभ होत आहे. पीयुसी द्वितीय वर्षाच्या परीक्षांपूर्वी प्रथम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे 12 ते 27 फेब्रुवारी दरम्यान प्रथम वर्षाच्या परीक्षा होणार आहेत. यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाने सर्व पदवीपूर्व कॉलेजना सूचना केल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून परीक्षांचा कालावधी सुरू होतो. सर्वात प्रथम पीयुसी प्रथम वर्षाची परीक्षा घेतली जाते. यानंतर टप्प्याटप्प्याने पीयुसी द्वितीय वर्ष व त्यानंतर दहावीची परीक्षा घेतली जाते. दि. 12 पासून प्रथम वर्षाच्या परीक्षांना सुरुवात होणार असल्याने शनिवार दि. 10 रोजीच पदवीपूर्व शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली. प्रश्नपत्रिका वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथम वर्षाच्या गुणांवरच पुढील प्रवेश दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनीही तयारी केली आहे. बारावीच्या परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार असल्याने त्यापूर्वी अकरावीच्या परीक्षा पूर्ण करण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाची धडपड सुरू आहे. 27 रोजी अकरावीच्या परीक्षा पूर्ण होणार असून पीयुसी परीक्षेच्या तयारीसाठी महाविद्यालयांना दोन दिवस उपलब्ध होणार आहेत.

Advertisement

परीक्षेचे वेळापत्रक

दि. 12 रोजी कन्नड, 13 रोजी समाजशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर सायन्स, 14 रोजी लॉजिक, बिझनेस स्टडीज, गणित व एज्युकेशन, 15 रोजी समाजविज्ञान व स्टॅस्टेस्टिक, 17 रोजी जिओग्राफी आणि बायोलॉजी, 19 रोजी इंग्रजी, 20 रोजी अकौंटन्सी, जिओलॉजी, होमसायन्स, 21 रोजी सायकॉलॉजी, केमिस्ट्री, बेसिक गणित, 22 रोजी इकॉनॉमिक्स, 23 रोजी हिंदी, 24 रोजी इतिहास व फिजिक्स, 26 रोजी मराठी, संस्कृत व इतर भाषा, 27 रोजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल व इतर विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article