महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काश्मीरमध्ये 119 दहशतवादी कार्यरत

06:22 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात 119 दहशतवादी कार्यरत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दहशतवाद्यांची कार्यपद्धती आणि रिक्रूटमेंट पद्धतीमध्येही बरेच परिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे. या केंद्रशासित प्रदेशाच्या पीर पांजाल भागाच्या उत्तरेला 79 दहशतवादी कार्यरत असून उरलेले 40 पीर पांजाल क्षेत्राच्या दक्षिणेला कार्यरत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

पीर पांजालच्या उत्तरेला कार्यरत असणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये 18 दहशतवादी स्थानिक तर 61 दहशतवादी विदेशी, अर्थात पाकिस्तानी आहेत. तर पीर पांजाल भागाच्या दक्षिणेला असणाऱ्या दहशतवाद्यांपैकी 34 दहशतवादी विदेशी तर केवळ 6 स्थानिक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक दहशतवाद्यांची संख्या कमी होत असून विदेशी दहशतवाद्यांची संख्या वाढल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

या वर्षात 25 घटना

दहशतवादी हिंसाचाराशी संबंधित अशा 25 घटना या वर्षात आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या आहेत. मात्र, बांदीपोरा भागात यावर्षी सर्वात कमी दहशतवादी घटना घडल्या. दहशतवाद्यांनी आपली कार्यक्षेत्रे बदललेली असल्याचे यावरुन स्पष्ट होते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. 2024 या वर्षात दहशतवादी घटनांमध्ये 24 सैनिक आणि अधिकारी यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. 2023 मध्ये दहशतवादी हल्ल्यांची संख्या यावर्षी इतकीच म्हणजे 25 होती आणि हौतात्म्य प्राप्त झालेल्या सैनिकांची संख्या 27 होती, असे दिसून येत आहे.

दहशतवाद्यांची हानी अधिक

2024 मध्ये आतापर्यंत सैनिकांशी झालेल्या चकमकींमध्ये 61 दहशतवादी ठार झाले आहेत. ही संख्या 2023 मध्ये ही संख्या 60 इतकी होती. या साठपैकी 12 विदेशी तर उरलेले स्थानिक दहशतवादी होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अलिकडच्या काळात दहशतवादी घटनांची संख्या बरीच कमी झाली आहे. भारतीय सेनेने सीमेवर गस्त वाढविल्याने आणि दहशतवाद्यांच्या विरोधात सातत्याने अभियान चालविल्याने सीमेवरील दहशतवादी घटनांमध्ये घट झाली आहे. तसेच केंद्र शासित प्रदेशाच्या आतल्या भागातही दहशतवाद्यांच्या कारवायांवर परिणाम झाला आहे. सीमावर्ती भागांमध्ये सैनिकांनी जोरदार कारवाई केल्याने दहशतवाद्यांना आता आतल्या भागांमध्ये आश्रय घ्यावा लागत असल्याचे दिसून येते. तसेच त्यांना आपले धोरण आणि कार्यपद्धती बदलावी लागत असल्याचे दिसते. हे सैनिकांच्या कारवाईचे यशही आहे आणि सैनिकांसमोर असणाऱ्या नव्या आव्हानांचाही हा प्रत्यय आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article