For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विकास इकोटेची 119 कोटींच्या कर्जाची परतफेड

06:09 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
विकास इकोटेची 119 कोटींच्या कर्जाची परतफेड
Advertisement

आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त होण्याचे कंपनीचे उद्दिष्ट

Advertisement

नवी दिल्ली

रिसायकलिंग कंपनी विकास इकोटेकने 119 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. कंपनीने या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त होण्याचे ध्येय निश्चित केले आहे. कंपनीने सादर निवेदनानुसार कंपनीचे थकित कर्ज आता 42.5 कोटी रुपये आहे.  विकास इकोटेकच्या अधिकाऱ्याने एका निवेदनात सांगितले की, ‘या आर्थिक वर्षात आतापर्यंत आम्ही आमच्या कर्जदारांना 118.70 कोटी रुपये दिले आहेत. आता आमचे उद्दिष्ट 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त कंपनी बनण्याचे आहे. कंपनी पीईटी (पॉलीथिलीन टेरेफ्थालेट) संयुगे आणि पीव्हीसी (पॉलिव्हिनाईल क्लोराईड) संयुगे पुनर्वापराद्वारे तयार करते.

Advertisement

Advertisement
Tags :

.