For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोग्य खात्याच्या हाऊसकिपिंग कंत्राटात 118 कोटींचा घोटाळा

12:05 PM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरोग्य खात्याच्या हाऊसकिपिंग कंत्राटात 118 कोटींचा घोटाळा
Advertisement

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांचा आरोप

Advertisement

पणजी : आरोग्य खात्याच्या हाऊसकिपिंग कंत्राट निविदेत स्वमर्जीतील आस्थापनाला कंत्राट देऊन 118 कोटी ऊपयांचा घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेस नेते गिरिश चोडणकर यांनी केला आहे. रविवारी पणजीत काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या घोटाळ्यास आरोग्यमंत्री विश्वजित राणे जबाबदार असल्याचा दावा चोडणकर यांनी केला आहे. एका भाजप कार्यकर्त्याने सादर केलेली सर्वात कमी किमतीची निविदा नाकारून त्यापेक्षा दुप्पट बोली लावलेल्या इको क्लीन सिस्टीम या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. यावरून भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले नेतेच आता या पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांच्या मुळावर उठले आहेत, याचा हा पुरावा आहे. भाजप कार्यकर्ते प्रदीप शेट यांनी महालसा सर्व्हिसेसच्या माध्यमातून 47.03 कोटी ऊपयांची निविदा सादर केली होती, तर त्यापेक्षा दुप्पट किमतीचा अर्थात सुमारे 104.8 कोटी ऊपयांची निविदा ‘इको क्लीन’ या कंपनीने सादर केली होती. सरकारने इको  क्लीनला कंत्राट बहाल केले आहे, असे चोडणकर म्हणाले. सदर कंत्राट हे पाच वर्षांसाठी असले तरी आणखी पाच वर्षांची वाढ देण्याचे प्रयोजन त्यात आहे. त्यामुळे एवढे मोठे कंत्राट आरोग्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंपनीलाच देण्यात येईल हे आधीच निश्चित झाले होते, म्हणूनच महालसा सर्व्हिसेसची बोली ‘10 कोटींच्या कामाचा अनुभव’ नसल्याच्या कारणावरून नाकारण्यात आली, असे ते म्हणाले. या अन्यायाआड उच्च न्यायालयात जाण्याचे धैर्य प्रदीप शेट यांनी दाखवले व तेथे न्यायालयाने त्यांना न्याय दिला. न्यायालयाने त्यांची आर्थिक बोली उघडण्याचे आणि तांत्रिक बोलीवर पुनर्विचार करण्याचे निर्देश सरकारला दिले, हे उत्तम आहे, अशी माहिती चोडणकर यांनी दिली. पत्रकार परिषदेस विरेंद्र शिरोडकर, फ्लोरियानो मिरांडा व अन्वर सय्यद यांची उपस्थिती होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.