कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

113 वर्षे जुन्या पत्राला 3.41 कोटीची किंमत

06:32 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टायटॅनिक जहाजाच्या एका प्रवाशाने लिहिलेले पत्र ब्रिटनमध्ये लिलावात विक्रमी किमतीत विकले गेले आहे. कर्नल आर्चीबाल्ड ग्रेसी यांचे हे पत्र एका गुप्त खरेदीदाराने 3.41 कोटी रुपयांमध्ये (3 लाख पाउंड) खरेदी केली आहे. हा लिलाव इंग्लंडच्या विल्टशायरमध्ये ‘हेन्री एल्ड्रिज अँड सन’ लिलावघरात पार पडला आहे.

Advertisement

Advertisement

या पत्राची प्रारंभिक अनुमानित किंमत सुमारे 60 हजार पाउंड होती, परंतु याला 5 पट अधिक किंमत मिळाली आहे. या पत्राला ‘भविष्यवाणी सारखे’ म्हटले जात आहे, कारण यात कर्नल ग्रेसी यांनी स्वत:च्या मित्राला उद्देशून ‘हे जहाज चांगले आहे, परंतु याविषयी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी स्वत:चा प्रवास संपण्याची प्रतीक्षा करेन’ असे नमूद केले होते.

हे पत्र 10 एप्रिल 1912 रोजी लिहिण्यात आले होते, त्याच दिवशी कर्नल ग्रेसी हे टायटॅनिकवर सवार झाले होते. 5 दिवसांनी जहाज उत्तर अटलांटिक समुद्रात एका हिमनगाला धडकून बुडाले होते. या जहाज दुर्घटनेत सुमारे 1500 जणांना जीव गमवावा लागला होता.

कर्नल ग्रेसी हे फर्स्ट क्लास प्रवासी होते  आणि त्यांनी केबिन नंबर सी51 मधून हे पत्र लिहिले होते. हे पत्र दुसऱ्या दिवशी 11 एप्रिल रोजी टायटॅनिक आयर्लंडच्या क्वीन्सटाउनमध्ये (आता कोव्ह) येथे थांबले असताना पोस्ट करण्यात आले होते. पत्रावर 12 एप्रिलचा लंडन पोस्टमार्क देखील लावलेला होता.

लिलावघरानुसार हे टायटॅनिकशी निगडित आतापर्यंतचे सर्वात महाग विकले जाणारे पत्र ठरले आहे. टायटॅनिक दुर्घटनेतून वाचल्यावर कर्नल ग्रेसी यांनी ‘द ट्रूथ अबाउट द टायटॅनिक’ नावाचे पुस्तक लिहिले होते, त्यात त्यांनी दुर्घटनेसंबंधीचा स्वत:चा अनुभव नमूद केला होता. थंड पाण्यात एका उलटलेल्या लाइफबोटवर चढून कशाप्रकारे वाचलो हे त्यांनी सांगितले होते. परंतु लाइफबोटवर पोहोचणारे अनेक लोक थंडी आणि थकव्यामुळे मृत्युमुखी पडल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

कर्नल ग्रेसी या दुर्घटनेतून वाचले होते, परंतु त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. पुढील काळात ते कोमामध्ये गेले आणि 4 डिसेंबर 1912 रोजी मधुमेहाशी निगडित समस्यांमुळे त्यांचे निधन झाले हेते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article