महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मदतसामग्रीवर तुटून पडला जमाव, 112 ठार

06:03 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गाझामधील प्रकारानंतर जागतिक समुदाय संतप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ गाझापट्टी

Advertisement

गाझामध्ये मदतसामग्रीची प्रतीक्षा करत असलेल्या 112 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून 760 जण जखमी झाले आहेत. गाझा शहराच्या किनारी रस्त्यावर जमावाने लॉरींच्या ताफ्याला रोखले होते, हा प्रकार इस्रायली रणगाड्यांच्या उपस्थितीत घडला होता. इस्रायलच्या सैन्याने यावेळी इशारा देत गोळीबार केला होता. तर रणगाड्यांनी थेट लोकांवर गोळीबार केल्याचा दावा काही पॅलेस्टिनींनी केला आहे. या घटनेत बहुतांश जण वाहनांखाली चिरडले गेल्याने मारले गेले आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेने या घटनेवर चर्चा करण्यासाठी बंद दाराआड एक आपत्कालीन बैठक आयोजित केली. अन्न मिळवू पाहणाऱ्या लोकांवर गोळीबार करणे चुकीचे होते असे फ्रान्सने म्हटले आहे. तर अमेरिकेच्या अध्यक्षांनी याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. जमावाकडून धमकी मिळाल्यावर सैनिकांनी गोळीबार केला होता, परंतु या गोळीबारात 10 हून अधिक जण मृत्युमुखी पडले नसल्याचा दावा इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

आतापर्यंत 30 हजार जणांचा मृत्यू

7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलने कारवाई सुरू केली आहे. इस्रायलच्या कारवाईत गाझापट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून गाझापट्टीचा उर्वरित क्षेत्राशी असलेला संपर्क तुटल्याने मदतसामग्री पोहोचणे अवघड ठरले आहे. तर दुसरीकडे युद्धात आतापर्यंत 30 हजार लोक मारले गेले आहेत.

मदतसामग्री असलेल्या ताफ्यांवर हल्ला

गाझाच्या बहुतांश हिस्स्यांमध्ये मदतसामग्री पोहोचणे जवळपास अशक्य ठरले आहे, या स्थितीमुळे हताश लोकांची गर्दी मदतसामग्री पुरवठा करणाऱ्या वाहनांवर तुटून पडू लागली आहे. गाझामधील 23 लाख पॅलेस्टिनींपैकी एक चतुर्थांश लोक उपासमारीचा सामना करत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article