आचऱा समुद्रात ऑलिव्ह रिडले कासवांच्या 110 पिल्लांना सोडले
अॕलिव्ह रिडले कासव आचरा तोंडवळी किनाऱ्याला देतायत पसंती
आचरा प्रतिनिधी
आचरा समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी कासव मित्र सूर्यकांत धुरी यांनी संवर्धन केलेल्या कासवाच्या अंड्यातून कासवाची पिल्ले 110 जन्मलेल्या कासव पिल्लांना अंगणवाडीतील मुलांच्या हस्ते समुद्री अधिवासात सोडण्यात आले आले. आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यावेळी कांदळगाव येथील वनरशक संजीव जाधव, सूर्यकांत धुरी, नितांत कुबल, केशव कुबल, पोलीस पाटील तन्वी जोशी, जगन्नाथ जोशी, पिरावाडी येथील अंगणवाडी मदतनीस श्रावी परडकर,सृष्टी धुरी, पिरावाडी येथील अंगणवाडी चे बाल विध्यार्थी उपस्थित होते.सुर्यकांत धुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करत बुधवारी ५१ दिवसानी त्या अंड्यांपासुन बाहेर पडलेल्या 110 पिल्लांची बॅच आचरा समुद्रात सोडली आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती या वर्षाच्या सुरुवाती पासून कासव संवर्धनास वेग आला असून तब्ब्ल 28 घरटी आचरा किनाऱ्यावर तयार करण्यात आली आहेत यातील या बॅच टप्प्या टप्प्याने सोडण्यात येणार आहे. ही कसवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वीपासून समुद्र किनारी संरक्षित करण्याचे काम कासव मित्रानी हाती घेतले आहे. आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होत असून या किनाऱ्यांना पसंती देत आहेत. अॕलिव्ह रिडले ह्या कासव जमातीची कासवे या किनाऱ्यास पसंती देताना दिसत आहेत. आचरा ते तळाशील कासवांच्या अंडी घालण्याचा किनारा म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जाऊ लागला आहे. या भागातील ग्रामस्थ ही अंडी सुरक्षित ठेऊन अन्य हिंस्त्र प्राण्यां पासून त्यांचे जतन करत आहेत. दोन महिन्यानंतर पिल्ले बाहेर पडली की वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सोडत आहेत.
फोटो परेश सावंत
आचरा किनाऱ्यावर संवर्धन केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या 110 पिल्लांना अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले