For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | सोलापुरात खेळता खेळता अघटित! घरात खेळताना पडद्याच्या दोरीचा गळफास लागून ११ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

05:48 PM Jun 10, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापुरात खेळता खेळता अघटित  घरात खेळताना पडद्याच्या दोरीचा गळफास लागून ११ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
Advertisement

Advertisement

सोलापूर -घरात खेळत असताना अचानक पडद्याच्या दोरीचा गळफास लागल्याने एका अकरा वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.मिहिर शुभम इगवे असे या मरण पावलेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना न्यू पाच्छा पेठ येथील क्रांती झोपडपट्टी येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. मिहिर हा चालू शैक्षणिक वर्षात सहावीच्या वर्गात जाणार होता.

सोमवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे घरात खेळत होता. मात्र, खेळत असताना अचानक दरवाजाच्या पडद्याचा फास त्याच्या गळ्याला बसला. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मिहिरला एकाखासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. मृत मिहिरचे वडील खासगी बँकेत असून, आई घरी असते. मिहिर हा मोठा मुलगा होता. या घटनेची प्राथमिक नोंद जेलरोड पोलीस चौकीत करण्यात आली. तपास पोलीस हवालदार करण कांबळे करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.