For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara: झोक्याच्या दोरीचा गळफास, 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

03:47 PM Jul 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
satara  झोक्याच्या दोरीचा गळफास  11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू  आई वडिलांचा टाहो
Advertisement

काही वेळाने असदची आई त्याला पाहण्यासाठी आत गेली असता...

Advertisement

भुईंज : जांब (ता. वाई) गावात एक काळजाला चटका लावणारी घटना घडली खेळता खेळता दोरी गळ्याभोवती अडकली आणि अवघ्या अकरा वर्षाच्या असदचा दुर्दैवी आकस्मित मृत्यू झाला. या संदर्भात माहिती अशी की, कमरुद्दीन रशीद इनामदार हे जांब येथील आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. ते जांब ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचा मोठा मुलगा हा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. लहान मुलगा असद हा इयत्ता पाचवीच्या वर्गात जांबेतील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिकत होता. तो आजारी असल्याने घरीच थांबला. घरी पाहुणे आल्याने आई पाहुणचार करत होती.

Advertisement

त्यावेळी असद हा घरातील दुसऱ्या रूममध्ये छताला बांधलेल्या दोरखंडाशी झोका खेळत होता. खेळता खेळता छताला लावलेल्या दोरीचा फास अचानक त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला. काही वेळाने असदची आई त्याला पाहण्यासाठी आत गेली असता असद हा दोरीला लटकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी आरडाओरडा सुरू केला. आरडाओरडा ऐकून शेजारील लोकांचा जमाव त्या ठिकाणी जमल्यानंतर त्याला खाली उतरवले. तातडीने त्याला खाजगी वाहनाने भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर असदला मृत घोषित केले.

या घटनेने उपस्थित नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. खेळता खेळता एका निष्पाप चिमुकल्याचा असा करून अंत झाल्याने जांब गावासह परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

आई-वडिलांचा टाहो

कमरुद्दीन यांची ही दोन्ही मुलं त्यांचे आनंदाचे स्त्रोत होते. लहानग्याच्या मृत्यूने ते पूर्णत: कोलमडले गेले आहेत. असद हा शाळेतील गुणवंत आणि खूप हुशार विद्यार्थी होता. तो परिसरातील सगळ्यांचाच लाडका होता. त्याला अंत्यविधीसाठी नेहताना आई-वडिलांनी फोडलेल्या हंबरडयाने या ठिकाणी उपस्थितांना सुद्धा अश्रू आवरता आले नाहीत.

Advertisement
Tags :

.