For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेससह ११ गाड्या १२ दिवसांसाठी रद्द

06:15 PM Dec 26, 2023 IST | Abhijeet Khandekar
solapur   कलबुर्गी कोल्हापूर एक्स्प्रेससह ११ गाड्या १२ दिवसांसाठी रद्द
Kalburgi-Kolhapur Express
Advertisement

सांगली-मिरज सेक्शन दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक; दुहेरीकरणाचे काम चालणार

Advertisement

सोलापूर प्रतिनिधी
कधी तांत्रीक काम तर कधी अपघात, अशा एक ना अनेक कारणांमुळे गत काही दिवसांपासून रेल्वे प्रवासाचा खोळंबा होत आहे. पुणे विभागातील सांगली-मिरज सेक्शन दरम्यान गाड्या रद्द तर इतर मार्गावरुन वळविण्यात आल्या आहेत. सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणारी कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेससह अन्य ११ गाड्या १२ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
मध्य रेल्वेतील पुणे विभागात सांगली-मिरज सेक्शन दरम्यान एनआय (नॉन इंटरलॉकिंग) आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या काम करिता गाड्या रद्द, मार्ग परिवर्तन करण्यात आले आहेत. हा ब्लॉक मंगळवार २६ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान चालणार आहे.
२६ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस गाड्या -
- कलबुर्गी-कोल्हापूर
- मिरज-परळी डेमू
- मिरज-कुर्डुवाडी डेमू
- कोल्हापूर-नागपूर
- कोल्हापूर-धनबाद
- यशवंतपूर-पंढरपूर
शॉर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या -
२५ डिसेंबर ते ५ जानेवारी पर्यंत गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही पुणे रेल्वे स्थानकापर्यंत धावेल. २६ डिसेंबर ते ६ जानेवारी पर्यंत कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ही पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल. २५ डिसेंबर : धनबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस ही कुर्डुवाडी रेल्वे स्थानक पर्यंत धावेल.
२६ डिसेंबर : नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस ही कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापर्यंत धावेल.
या गाड्यांचा मार्ग बदलला -
२६ डिसेंबर : म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस ही व्हाया हुबळी, गदग, होटगी, सोलापूर, दौंड, पुणे मार्गे धावेल.
२७ डिसेंबर : बंगळूरू-जोधपूर एक्स्प्रेस ही व्हाया हुबळी, गदग, होटगी, सोलापूर, दौंड, पुणे मार्गे धावेल.
३० डिसेंबर : बंगळूरू-गांधीधाम एक्स्प्रेस ही व्हाया हुबळी, गदग होटगी,सोलापूर, दौंड, पुणे मार्गे धावेल.

Advertisement
Advertisement
Tags :

.