For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

11 खेळाडूंवरील डोपिंगसंदर्भातील बंदीत घट

06:22 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
11 खेळाडूंवरील डोपिंगसंदर्भातील बंदीत घट
Advertisement

राष्ट्रीय खेळांत सहभागी झालेल्या तीन अॅथलीट्सचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेल्या वर्षी गोव्यातील राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत सहभागी झालेल्या तीन ट्रॅक अँड फील्ड अॅथलीट्ससह 11 खेळाडूंना डोपिंगचा आरोप त्वरित स्वीकारल्याचा फायदा झाला असून त्यामुळे राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने निर्बंध घटवून त्यांच्यावरील बंदी तीन वर्षांवर आणली आहे.

Advertisement

कमलजित कौर (100 मी. आणि 200 मी.), अजय कुमार (5000 मी. आणि 10000 मी.) आणि हरजोधवीर सिंग (5000 मी. आणि 10000 मी.) या तीन धावपटूंनी 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरदरम्यान गोव्यात झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेतला होता. नेहमीच्या चार वर्षांऐवजी ज्यांची बंदी घटवून तीन वर्षांवर आणली गेली आहे त्या यादीत या तिघांची नावे झळकली आहेत. गोव्यातील राष्ट्रीय खेळादरम्यान घेण्यात आलेल्या चाचण्यांतून विविध खेळांमध्ये सहभागी झालेले 20 हून अधिक खेळाडू हे बंदी असलेली औषधे वापरण्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह ठरले होते.

पंजाबच्या कमलजितने राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत महिलांच्या 200 मीटर (23.84 सेकंद) शर्यतीमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि 100 मीटर (11.73 सेकंद) शर्यतीमध्ये सहावे स्थान पटकावले होते. ड्रोस्टॅनोलॉन या सिंथेटिक अॅनाबॉलिक स्टिरॉइडसंदर्भात तिची चाचणी सकारात्मक आली होती. डार्बेपोएटिन आणि मॉर्फिनसंदर्भात सकारात्मक चाचणी आलेल्या अजय कुमारने पुऊषांच्या 5000 मीटर (14:13.33) शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते आणि 10,000 मीटर (30:39.91) शर्यतीमध्ये सहावे स्थान पटकावले होते. राष्ट्रीय खेळांत त्यान गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते. पंजाबचा हरजोधवीर, ज्याची चाचणी देखील डार्बेपोएटिन आणि मॉर्फिनसाठी पॉझिटिव्ह आली, त्याला राष्ट्रीय खेळांमध्ये कोणतेही पदक जिंकता आले नव्हते.

Advertisement
Tags :

.