कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्ल्यात 11 प्रकरणे तडजोडीने निकाली

05:20 PM May 10, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

राष्ट्रीय लोक अदालतीत 3 लाख 13 हजार 930 रुपये वसूल : फौजदारी 7 प्रकरणे निकाली

Advertisement

वेंंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले येथील राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 11 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली असून 3 लाख 13 हजार 930 एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.
येथील दिवाणी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन वेंगुर्ले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा वेंगुर्लेचे दिवाणी न्यायाधीश डी. वाय. रायरीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी अँड. एस. जी. ठाकुर, अँड. एस. व्ही. झांटये, विधी स्वयंसेवक रुपाली पाटील, अन्य वकील यांचेसह पक्षकार व न्यायालयातील वरिष्ठ अधीक्षक लिपिक उपस्थित होते. या राष्ट्रीय लोक अदालतीचे काम पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश डी. वाय. रायरीकर यांच्या अध्यक्षतेखाली व अँड. एस. जी. ठाकुर, अँड. अँड. एस. व्ही. झांटये, विधी स्वयंसेवक रुपाली पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोक अदालतीचे काम पार पडले. या राष्ट्रीय लोक अदालतीत दिवाणी स्वरुपाची 6, फौजदारी स्वरूपाची 22 तर वादपुर्वची 91 अशी एकुण 119 प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी दिवाणीचे 1, फौजदारी ची 7 व वादपुर्वची 3 अशी एकूण 11 प्रकरणे निकाली निघून 3 लाख 13 हजार 930 एवढ्या रकमेची वसुली करण्यात आली.सदरची राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वीज वितरणचे सहाय्यक लेखापाल अमेय बिले आदी उपस्थित होते. सदर राष्ट्रीय लोक अदालतीचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी न्यायालयाच्या सहाय्यक अधीक्षक श्री. खेडेकर, श्रीमती एम.एन.राऊळ तसेच न्यायालयीन कर्मचारी वरिष्ठ लिपिक सौ. पी. पी शिरसाट, श्रीमती व्ही. व्ही. नाईक, श्रीमती एम. एम. केळजी, कनिष्ठ लिपिक एस. ए. बिलये, श्रीमती के. के. वारंग, श्रीमती राजापुरकर, लघुलेखक चंद्रकला चव्हाण, सिध्दाली कोनयेकर, ए.जे. चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # lokadalat # court # vengurla # news update वेंगुर्ल्यात 11 प्रकरणे तडजोडीने निकाली
Next Article