For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | वाकरे सुन्न! दहावीत उत्तीर्ण होऊनही १६ वर्षीय हर्षवर्धनची टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या

09:57 AM May 13, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   वाकरे सुन्न  दहावीत उत्तीर्ण होऊनही १६ वर्षीय हर्षवर्धनची टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या
Advertisement

                     58 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Advertisement

वाकरे : शाहूनगर, वाकरे (ता.करवीर) येथील हर्षवर्धन रणजीत कांबळे (वय १६) या इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यान घरातील झालेल्या लाकडी वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. हर्षवर्धन हा दहावी परीक्षेत ५८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता.

कोणतेही कारण नसताना मंगळवारी दुपारी त्याने घरातील वाशाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्योतीराम कांबळे यांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची करवीर पोलिसात नोंद झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.