माणगाव खोऱ्यात दहावीच्या विद्यार्थिनीची गळफासाने आत्महत्या
03:11 PM Feb 22, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
कुडाळ / प्रतिनिधी
Advertisement
तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथील रहिवासी कु.विराली विठ्ठल रेमुळकर ( 16 ) या दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने शनिवारी आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.कु विराली ही वाडोस हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होती. अभ्यासाचे टेन्शन घेऊन तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. नुकत्याच दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि विराली हिने आपल्या घरात आत्महत्या केल्याने कुटुंबीयांसह सर्वच दुःख सागरात बुडाले आहेत. शनिवारी सायंकाळी उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यात फोन वरून स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर कुडाळ व माणगांव पोलीस मोरे येथे तपासासाठी रवाना झाले होते.
Advertisement
Advertisement