दहावी परीक्षेचा निकाल आज
दुपारी 12 वाजता जाहीर होणार : तृतीय भाषेसाठी गुणच : शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांची माहिती
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :
तृतीय भाषेसाठी गुण की ग्रेड, या मुद्द्यावरून बराच गोंधळ निर्माण झालेला असतानाच दहावी परीक्षेच्या निकालासाठी मुहूर्त निश्चित झाला आहे. गुरुवार 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली. तसेच हिंदीसह तृतीय भाषा विषयांसंबंधी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे तृतीय भाष विषयांसाठी ग्रेडऐवजी गुणच दिले जातील.
लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता असलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना क्arrाsल्त्ts.हग्म्.ग्ह आणि क्sाaं.क्arहूक्a.gदन्.ग्ह या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. 20225-26 या शैक्षणिक वर्षात दहावी परीक्षा-1 ला 8 लाखहून अधिक विद्यार्थी बसले होते.
राज्यात दहावी परीक्षा सुरू असतानाच राज्य सरकारने द्विभाषा धोरणाचा एक भाग म्हणून हिंदीसह तृतीय भाषा विषयांसाठी गुणांऐवजी ग्रेड देण्याची घोषणा केली होती. नंतर यासंबंधी मसुदा अधिसूचनाही जारी केली. मात्र, तीन विद्यार्थ्यांनी सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने सरकारला परीक्षेची अधिसूचना जारी करताना जे नियम होते, त्यानुसार मूल्यांकन करण्याचा आदेश दिला होता. सरकारने या आदेशाबाबत फेरविचार याचिका दाखल केली होती. मंगळवारी न्यायालयाने ग्रेडऐवजी गुणच द्यावेत, असा आदेश दिल्यानंतर सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय घेतला.
या संदर्भात बुधवारी सायंकाळी शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा आणि शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी गुरुवारी दुपारी 12 वाजता दहावी परीक्षा-1 चा निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा केली. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यंदा न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर करताना सर्व मुद्दे मांडले जातील. ग्रेस मार्कबाबत यावेळी स्पष्ट केले जाईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.