For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सोमवारपासून दहावीची परीक्षा

11:05 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोमवारपासून दहावीची परीक्षा

पणजी : येत्या सोमवार दि. 1 एप्रिलपासून दहावीची (एसएससी) परीक्षा सुऊ होणार असून ती 24 एप्रिलपर्यंत चालणार आहे. राज्यातील 31 परीक्षा केंद्रातून ती घेण्यात येणार असून एकूण 19573 परीक्षार्थी ती परीक्षा देणार आहेत. त्यात 9757 मुले तर 9816 मुलींचा समावेश आहे. गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भागिरथ शेटये यांनी वरील माहिती दिली आहे. मागील वर्षी 2023 मध्ये एकूण 20476 मुलांनी परीक्षा दिली होती. यंदाच्या वर्षी ती संख्या किंचित कमी झाली आहे. दरदिवशी सकाळी 9.30 वा. परीक्षा चालू होणार असून परीक्षार्थिंनी 45 मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असा सल्ला मंडळातर्फे देण्यात आला आहे. परीक्षेसाठी असलेली आसन व्यवस्था मंडळाच्या वेबसाईटवर जारी करण्यात आली असून परीक्षार्थिंनी आपापल्या केंद्रांची खात्री कऊन घ्यावी तसेच गरज भासल्यास आपापल्या शाळांशी संपर्क साधावा, असे मंडळाने कळवले आहे. टक्केवारी वाढवण्यासाठी 258 परीक्षार्थी बसणार असून 363 खासगी परीक्षार्थी आहेत. प्रत्येक उमेदवाराने आपली परीक्षा कोणत्या दिवशी आहे याची खात्री कऊन घ्यावी, असेही मंडळाने म्हटले आहे. दरम्यान, बारावीची परीक्षा या आधी संपली असून तिचा निकाल लवकर लागणार अशी शक्यता आहे. दहावीचा निकालही मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.