आजपासून दहावीची परीक्षा
12:19 PM Mar 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : गोवा बोर्डाची दहावीची परीक्षा आज शनिवार दि. 1 मार्चपासून सुरु होत असून एकूण 18871 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात 9574 मुली तर 9297 मुले आहेत. राज्यातील एकूण 32 केंद्रातून परीक्षा घेण्यात येणार असून 21 मार्चपर्यंत चालणार आहे. मार्च 2024 मध्ये एकूण 18914 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. जवळपास तेवढ्याच संख्येने यंदाही परीक्षार्थी आहेत. परीक्षेसाठी केंद्रावर वेळेपूर्वी अर्धातास आधी पोहोचावे. परीक्षा चालू झाल्यावर अर्ध्या तासानंतर आलेल्यांना अपात्र ठरवले जाणार असल्याचे बोर्डातर्फे कळवण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement