माजगावात स्व.भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती
आ . केसरकरांसह विक्रांत सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
सावंतवाडी । प्रतिनिधी
माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती येथील माजगाव समाधीस्थळी बुधवारी साजरी करण्यात आली. आमदार दिपक केसरकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांना जयंती दिनी अभिवादन करण्यात आले. लोकनेते व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांची १०२ व्या जयंती निमित्त त्यांच्या माजगाव येथील प्रेरणा समाधी स्थळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आमदार दिपक केसरकर, सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, बबन साळगावकर,अमोल सावंत, प्रदीप सावंत, अजित सावंत, व्ही बी नाईक, चंद्रकांत नाईक, अशोक दळवी, ॲड. दिलीप नार्वेकर,संजय कांनसे, रवींद्र म्हापसेकर, संदीप राणे, डॉ. दिनेश नागवेकर, प्रसाद सावंत, म.ल. देसाई, राजू कुबल, सचिन बिर्जे, संजय लाड, अर्चित पोकळे, मेघश्याम काजरेकर, प्रा धीरेंद्र होळीकर, एस पी नाईक, प्रा सतीश बागवे, आदी भाईसाहेब सावंत प्रेमी, नातेवाईक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.