महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंडमधील 102 टन सोने मायदेशी आणले

06:58 AM Nov 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय रिझर्व्ह बँकेची माहिती : बँक ऑफ इंग्लंडमध्ये आजही 324 टन सोने सुरक्षित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

धनत्रयोदशीच्या दिवशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीतून 102 टन सोने देशातील सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. परकीय चलन गंगाजळीच्या व्यवस्थापनाबाबतच्या एका नवीन अहवालात असे दिसून आले आहे की, सप्टेंबरच्या अखेरीस, आरबीआयकडे असलेल्या 855 टन सोन्यापैकी 510.5 टन सोने देशात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

सप्टेंबर 2022 नंतर 214 टन आयात 

सप्टेंबर 2022 नंतर देशात 214 टन सोन्याची आयात झाली आहे. जगभरातील वाढत्या भू-राजकीय तणावादरम्यान सरकारला सोने सुरक्षित ठेवायचे आहे. सरकारमधील बरेच लोक असे मानतात की सोने घरी ठेवणे अधिक सुरक्षित आहे.

मे महिन्यात 100 टन सोने भारतात

यापूर्वी 31 मे रोजी एका अहवालात म्हटले होते की ब्रिटनमधून 100 टन सोने भारतात आणले गेले आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला भारताची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आणि त्याला सोने गहाण ठेवावे लागले.

इतके सोने परत आणण्याची पहिलीच वेळ

गेल्या वेळी, आरबीआय आणि सरकारने हे सोने देशात आणण्यासाठी विशेष विमाने आणि सुरक्षा व्यवस्थांसह गुप्त मोहीम राबवली होती. सोने सुरक्षित राहावे, यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती लीक होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असते.

विदेशातही सोने

केवळ भारतातच नाही तर विदेशातही आरबीआयकडे सोने आहे. सर्व देशांच्या मध्यवर्ती बँकांना सोने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे असते जेणेकरून धोका कमी करता येईल. सर्वप्रथम, सोन्याची सुरक्षितता लक्षात घेतली जाते.

आपत्तीमुळे किंवा राजकीय अस्थिरतेमुळे भारतात आर्थिक परिस्थिती बिकट असेल, तर आता विदेशात सोने साठवले जाते. सोने स्वतंत्र ठिकाणी ठेवल्याने हा धोका कमी होतो.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article