For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात पोलिओ लसीकरण 102 टक्के

10:26 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यात पोलिओ लसीकरण 102 टक्के
Advertisement

उद्दिष्ट गाठण्यात आरोग्य खात्याला यश : 19 हजार 920 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Advertisement

बेळगाव : पोलिओच्या संपूर्ण उच्चाटनासाठी देशभरात राष्ट्रीय पोलिओ अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत बेळगाव जिल्ह्यामध्ये आरोग्य खात्याकडून 102 टक्के लसीकरण डोस देण्यात आले. नियोजित उद्दिष्ट गाठण्यात आरोग्य खात्याला यश आले आहे. ग्रामीण भागामध्ये तीन दिवस तर शहरी भागामध्ये चार दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दरवर्षीप्रमाणे रविवार दि. 3 मार्च रोजी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. जिल्ह्यामध्ये आरोग्य खात्याकडून 5 लाख 5 हजार 835 बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. शून्य ते पाच वयोगटातील बालकांना डोस देण्यासाठी आरोग्य खात्याकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. नियोजित उद्दिष्ट गाठण्याचे ध्येय ठेवण्यात आले होते. त्यानुसार या मोहिमेंतर्गत 5 लाख 17 हजार 572 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांहून अधिक डोस देण्यात आरोग्य खाते यशस्वी झाले आहे. तालुक्यानुसार नियोजित करण्यात आलेले उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. यासाठी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांसह आशा, अंगणवाडी व मदतनीस कार्यकर्त्यांच्या सहयोगाने हे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नियोजित उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य खात्याकडून 2 हजार 374 बुथ नियोजित केले होते. यासाठी 4 हजार 980 पथकांची नेमणूक करण्यात आली होती. प्रत्येक पथकामध्ये चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. अशाप्रकारे 19 हजार 920 कर्मचारी नियुक्त केले होते. या मोहिमेतून कोणतेच मुल चुकू नये, 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला डोस द्यावा, यासाठी रेल्वेस्थानक, बसस्थानक, मध्यवर्ती केंद्रे या ठिकाणी पोलिओ डोस उपलब्ध करून देण्यासाठी 108 फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.

कर्मचारी-नागरिकांच्या प्रतिसादामुळे शक्य

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य खात्याचे कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच नियोजित उद्दिष्ट गाठणे शक्य झाले आहे.

- डॉ.महेश कोणी-जिल्हा आरोग्याधिकारी

Advertisement
Advertisement
Tags :

.