Ambabai Temple | कुकुंमार्चन सोहळ्यातून १००८ नावांचा जागर
अंबाबाई मंदिर परिसर भक्तीने दुमदुमला
कोल्हापूर : पहाटेचा मंगल प्रहर, हवेत गारवा, साजशृंगाराने नटलेल्या महिला, करवीर निवासिनी अंबाबाईचे स्मरण आणि घरोघरी सुखसमृद्धी नांदू अशी केलेली प्रार्थना अशा भक्तीमय वातावरणात रविवारी अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ सौख्यदायी महाकुंकुमार्चन सामुदायिक उपासना सोहळा करण्यात आला. हिरव्या रंगाच्या साया नेसून सोहळ्यात साडे पाच हजारावर महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी एकासुरात अंबाबाईच्या १००८ नावांचे स्मरण करत देवीच्या पादुकांवर कुंकू अर्पण करत मंदिर परिसर भक्तीमय करून सोडला.
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आयोजित ११ व्या महाकुंकुमार्चन सामुदायिक उपासना सोहळा सलग अडीच तास सुरु राहिला. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, ठाणे, मुंबई, बेळगाव येथील सुवासिनी सहभागी होत्या. दरम्यान, सोहळ्यासाठी अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ आकर्षक मंडप उभारला होता. अंबाबाईची मूर्तीसह छञपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांचे पुतळे मंडपात विराजमान केले होते. महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी अंबाबाईसह छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहूंच्या पुतळ्याचे पूजनाने करुन कुंकुमार्चन सोहळ्याला आरंभ केला. सोहळ्याच्या उभारलेल्या मंडपापासून शेतकरी संघ कार्यालयासमोर कुंकुमार्चन करणाऱ्या महिलांना बसण्याची व्यवस्था केली होती.
हिरव्या रंगाच्या साच्या नेसून आणि साजशृंगाराने नटून थटलेल्या महिलांची पाऊले पहाटेपासून अंबाबाई मंदिराकडे वळली होती. पाहता पाहता मंदिर परिसर महिलांनी भरून गेला. कुंकुमार्चनाचा विधी करण्यासाठी त्यांनी भारतीय बैठक मारल्यानंतर त्यांना कुंकु, देवीच्या पादुका, नारळ, करवीर शक्तीचतुष्ठायात्रा पुस्तिका देण्यात आली. सुरुवातील करवीर क्षेत्रोपाध्याय वेदशास्त्रसंपन्न सुहास जोशी यांनी अंबाबाईच्या १००८ नावांची आळवणी व कुंकुमार्चनाचा विधी करण्यामागील पार्श्वभूमी सांगितली.
यानंतर सर्व महिलांनी पादुकांना द्रोणात ठेवून त्यावर कुंकुं अर्पण करण्याला सुरुवात केली. तसेच सुहास जोशी यांच्यासोबत करवीर निवासिनी अंबाबाईच्या १००८ नावांचे स्मरण केले. अडीच तास हा धार्मिक विधीचा कार्यक्रम सुरु राहिला. देवीच्या नावांची सांगता झाल्यानंतर घरोघरी सुखसमृद्धी नांदू दे सौभाग्य अखंड राहू अशी प्रार्थनाही सर्व महिलांनी केली. या सोहळ्याला आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओएसडी अमित हुक्केरीकर यांनी भेट देऊन महिलांना मार्गदर्शन केले. सोहळ्याच्या सांगतेनंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. यात भाग्यवान ठरलेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे