महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काकोरी रेल्वे अॅक्शनला 100 वर्षे पूर्ण

06:31 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शताब्दी वर्ष साजरा होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली येथील थिंक टँक सेंटर फॉर सिव्हिलायजेशनल स्टडीजकडून (सीसीएस) क्रांतिकारकांच्या आठवणी जोपासण्याच्या प्रयत्नांच्या अंतर्गत काकोरी रेल्वे अॅक्शनला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शताब्दी वर्ष समारंभ 8-9 ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या समारंभाचे उद्घाटन गुरुवारी दिल्लीच्या कॉन्स्टीट्यूशन क्लबमध्ये केले जाणार आहे.

इंग्रजांकडून भारतीयांकडून बळजबरीने करवसूली आणि अन्य स्वरुपात लुटण्यात आलेले धन परत मिळविण्याच्या उद्देशाने क्रांतिकारकांकडून 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरीनजीक इंग्रजांच्या रेल्वेगाडीवर आक्रमण करण्यात आले होते. ही घटना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणादायी ठरली होती. याचमुळे संस्कृती अध्ययन केंद्राने काकोरी रेल्वे अॅक्शनच्या शतकपूर्तीला व्यापकर समारंभाचे स्वरुप देण्याचा निर्णय घेतला आहे.

1925 मध्ये क्रांतिकारकांनी स्वत:चे शौर्य, संकल्प, साहस, स्वातंत्र्यप्रेम आणि त्यागाचा अद्भूत परिचर देत 08 डाउन, सहारनपूर-लखनौ पॅसेंजर रेल्वेत सशस्त्र हस्तक्षेप करत ब्रिटिश सरकारच्या खजिन्याला हस्तगत केले होते. रामप्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वात हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी यात भाग घेतला होता आणि काकोरीनजीक रेल्वे रोखून खजिना ताब्यात घेतला होता.

एका छोट्याशा ठिकाणी झालेल्या या घटनेनंतर इंग्रजांच्या साम्राज्याला आव्हान देण्याचा संदेश  देशभरात पोहोचला होता. या घटनेनंतर एकीकडे क्रांतिकारकांना नवी ऊर्जा मिळाली होती. दुसरीकडे इंग्रज हादरून गेले होते. या प्रकरणी इंग्रजांनी 40 जणांना अटक केली हाती. यातील 4 क्रांतिकारांना फासावर लटकविण्यात आले होते.

काकोरी रेल्वे अॅक्शन शताब्दी विषयक कार्यक्रम देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येणरा आहेत. या कार्यक्रमांचा उद्देश भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील काकोरीच्या घटनेचे महत्त्व आणि या विषयांवरील आतापर्यंत प्रचलित तथ्यहीन धारणांना दुरुस्त करणे असल्याचे अध्ययन केंद्राकडून सांगण्यात आले. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करत काकोरी क्रांतीशी संबंधित पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article