For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानात पाडविण्यात आले 100 वर्षे जुने मंदिर

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात पाडविण्यात आले 100 वर्षे जुने मंदिर
Advertisement

मदरशाच्या विस्तारासाठी जमिनीवर कब्जा : परिसरात तणाव

Advertisement

वृत्तसंस्था/इस्लामाबाद

पाकिस्तानात हिंदूंवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवरील कब्जा करण्याच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आता 100 वर्षांपेक्षा जुन्या एका हिंदू मंदिराला पाडविण्यात आले आहे. मंदिराच्या विरोधातील ही कारवाई त्याची जमीन नजीकच्या एका मदरशात सामील करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. जवळपास 125 वर्षे जुन्या मंदिराला पुन्हा उभारून कब्जा हटविण्याची मागणी आता पाकिस्तानातील हिंदू समुदाय करत आहे. प्रतिबंधित कट्टरवादी पक्ष तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानशी (टीएलपी) निगडित लोकांनी हे मंदिर पाडविले आहे. सुमारे 1 हजार चौरस मीटरमध्ये फैलावलेले मंदिर लाहोरपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर नारोवाल जिल्ह्यातील सिराज गावात होते. हे मंदिर 100-125 वर्षे जुने होते असे स्थानिक हिंदूंचे सांगणे आहे. तर मंदिर पावसामुळे कोसळल्याचा दावा सरकार करत आहे.

Advertisement

पुन्हा उभारण्याची मागणी

अल्पसंख्याकांवर केंद्रीत राजकीय पक्ष पाकिस्तान मसीहा मिल्लत पार्टीने (पीएमएमपी) मरियम नवाज यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारला मंदिर पाडविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आणि मंदिराची पुनउ&भारणी करण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी पंजाब प्रांताचे अतिरिक्त गृह सचिवांना भेटलो असून त्यांच्याकडे मंदिराची सुरक्षा न करू शकलेल्या अधिकाऱ्यांवर आणि मंदिर पाडविणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे पीएमएमपीचे अध्यक्ष अस्लम परवेज सहोत्रा यांनी सांगितले आहे.

प्रांतीय सरकारकडे मागणी

मंदिर तोडण्यात आल्यावर त्याच्या शिखरासाठी वापरण्यात आलेला धातू तसेच इतर सामग्री हटविण्यात आली आहे. मंदिराशी निगडित जमीन प्रथम विस्थापितांच्या संपत्तीसाठी स्थापन ट्रस्ट बोर्डाने एका मदरशाला भाडेतत्वावर दिली होती. नंतर हा करार रद्द करण्यात आला होता, कारण अनेक वर्षांपर्यंत कुठलेच भाडे भरले गेले नव्हते. अनेक लोकांनी येथील संपत्तीच्या अन्य हिस्स्यांवर कब्जा केलेला आहे. प्रांतीय सरकारने पुन्हा मंदिर मूळ स्वरुपात उभे करावे. तसेच पूर्ण पंजाब प्रांतातील हिंदू मंदिरे, शीख गुरुद्वारा आणि चर्चशी निगडित मालमत्तांची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी मागणी सहोत्रा यांनी केली आहे.

प्रशासन अपयशी

हिंदू समुदायाचे नेते रतन लाल यांनीही 100 वर्षांपेक्षा जुने मंदिर तोडण्याच्या घटनेची निंदा केली. जिल्हा प्रशासन आणि ईटीबीपी ठिकाणाची सुरक्षा करण्यास अपयशी ठरले आहे. हिंदू धर्मीय त्या ठिकाणी मदरसा चालविला जात असल्याने जाण्यास घाबरत असल्याचे रतनलाल यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.