For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिओ ग्राहकांना 100 जीबी मोफत क्लाउड डेटा

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिओ ग्राहकांना 100 जीबी मोफत क्लाउड डेटा
Advertisement

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा : ‘जिओ एआय क्लाउड वेलकम ऑफर’चे लाँचिंग

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दूरसंचार क्षेत्रासाठी तंत्रज्ञान, एआय विकास, संशोधन आणि विकासांशी संबंधीत अनेक घोषणा केल्या. ते रिलायन्सच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (रिलायन्स 47 वी एजीएम) बोलत होते. तेलापासून दूरसंचारपर्यंतचा त्यांचा समूह अल्पकालीन नफा मिळवण्याच्या आणि मालमत्ता जमा करण्याच्या व्यवसायात नाही, परंतु त्याचे लक्ष देशासाठी निधी उभारण्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या घोषणेमध्ये रिलायन्स जिओबद्दल एक मोठी घोषणा करताना, मुकेश अंबानी म्हणाले की कंपनी ‘जिओ एआय क्लाउड वेलकम ऑफर’ लाँच करत आहे. या अंतर्गत, जिओ वापरकर्त्यांना 100 जीबी मोफत क्लाउड स्टोरेज डेटा दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

एआय संदर्भात

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरताना लोकांना विविध समस्या जाणवतील कंपनीकडे त्या समस्या सोडवण्याच्या संधीही खुल्या आहेत. मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्सचे ध्येय जगातील सर्वात कमी किमतीचे एआय तयार करण्याचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

संशोधन आणि विकासावर खर्च

रिलायन्सने आर्थिक वर्ष 2024मध्ये संशोधन आणि विकासावर 3,643 कोटी (437 दशलक्ष डॉलर) पेक्षा जास्त खर्च केला, गेल्या चार वर्षांत संशोधनावरील खर्च 1.5 अब्ज रुपये इतका ओलांडला आहे. कंपनीत 1,000 हून अधिक शास्त्रज्ञ आणि संशोधक सर्व व्यवसायांमध्ये संशोधन प्रकल्पांसाठी महत्त्वाच्या विषयांवर काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

रिलायन्सचे 2,555 हून अधिक पेटंट दाखल

अंबानी म्हणाले की, रिलायन्सचे चालू असलेले तंत्रज्ञान-आधारित बदल कंपनीला उच्च वाढीच्या नवीन स्तरावर घेऊन जाईल आणि येत्या काही वर्षांत तिचे मूल्य वाढवेल. गेल्या वर्षी, रिलायन्सने 2,555 हून अधिक पेटंट दाखल केले, प्रामुख्याने जैव-ऊर्जा नवकल्पना, सौर आणि इतर हरित ऊर्जा स्रोत आणि उच्च-किंमत रसायने या क्षेत्रात. ‘डिजिटल हे आमच्या अंतर्गत संशोधनाचे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे, त्यामध्येही आणखीन पेटंट दाखल केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

तुम्हाला होणार हे फायदे : अंबानी

अंबानी म्हणाले की हे उच्च-गुणवत्तेचे फोटो, व्हिडिओ, दस्तऐवज, डेटा आणि डिजिटल सामग्री संग्रहित करण्यात मदत करेल. ज्यांना अधिक स्टोरेजची आवश्यकता असेल त्यांच्यासाठीही, कंपनीकडे बाजारात सर्वात स्वस्त दरातील ऑफर असणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Advertisement
Tags :

.