देश रक्षणार्थ सीमेवर तैनात जवानाच्या लेकीला १०० टक्के
सातारा / दीपक प्रभावळकर :
पेहलगाम हल्ल्यानंतर भारताने चालवलेल्या 'ऑपरेशन सिंदुर'मुळे संपूर्ण देशाच्या सीमेवर तणाव आहे. अशावेळी साऱ्या कुटुंबाला देशाच्या हवाली सोडून आपलं सैन्य अत्यंत प्रतिकुल स्थितीत देश रक्षणार्थ परम कर्तव्य निभावत आहे. अशा प्रचंड तणावात साताऱ्याच्या जवानानं आनंदाच्या भरात आसामच्या तेजपूर सीमेवर भारताच्या मातीवर डोकं ठेवून नमनं केलंय...... त्याचं कारण म्हणजे त्यांच्या थोरल्या लेकीनं दहावीच्या परीक्षेत शंभर पैकी शंभर टक्के मिळवून केवळ जिल्लधाचा, आपली शाळा गुरुकुलचाच सन्मान केला इतकंच नव्हे तर देशाच्या सीमेवर जीव मुठीत धरून रक्षणार्थ अग्नीकुंड पेटवलेल्या साऱ्या जवानांचा ऊर भरून आणला आहे.
ही कहाणी आहे, शाहूनगर सातारा येथे राहणान्या व गुरुकुल मध्ये शिकणाऱ्या 'संचेता घोडके' या मुलीची....!! सातारा जिल्हयाच्या लौकीकाप्रमाणे इयत्ता बारावीतून शिक्षण सोडून तुकाईवाडी (ता. सातारा) येथील रहिवासी असलेले सचिन घोडके यांनी लष्करात भरती होऊन देशसेवा पत्करली खरी पण शिक्षण अपुरे राहिल्याचे शल्य त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पुढे लग्न झालं. पहिली लेक. बरस आपलं शिक्षण अपुरं झालं असलं तरी लेकीला शक्य तितके शिकवायचं म्हणून त्यांनी आपली पत्नी सीमा आणि लेकीला शाहूनगरमध्ये शिक्षणासाठी ठेवलं.
संचेताला कधीचं शिक्षणासाठी प्रेशर केलं नाही. लढवय्या पप्पा घरी आला की, पोरी तुला जमलं तितका अभ्यास कर. पहिला नंबर आलाच पाहिजे असं नाही पण भरपूर शिक हा पप्पांचा कायम हट्ट राहिला.
खरं तर संचेता ही लहानपणापासून अतिहुशार अशा कॅटेगिरीमधली नव्हती. तिला खो-खो खेळायला आवडायचं, तिची पेंटींग सुद्धा खुप चांगली असत. ना घराच्यांकडून फार अपेक्षा, ना आभ्यासाचा मागे लागलेला भोंगा तरी वयात येताना संचेताला आपल्या पप्पांचं आपल्यावरचं प्रेम आणि दिलेली मोकळीकता सारं जाणवू लागलं होतं. कोणी म्हंटलं नसलं तरी आपण आपल्या शाळेत तरी टॉपर व्हायचं अशी तिनं जणू खुणगाठ मारली असावी. फक्त शाळा एक्के शाळा, नो एक्ट्रा क्लास.... तरी आज संचेताला शंभर पैकी शंभर टक्के मिळालेत. पप्पा देशरक्षणासाठी कायम क्युटीवर त्यामुळे आई सीमा यांच्यावर तिच्या अभ्यासाची जबाबदारी पडलेली असायची. अभ्यास सोडून चित्रे रंगवत बसली म्हणून आई कथी तिच्याबर ओरडली नाही. तो तिचा छंद आहे म्हणून त्यातही तिला प्रोत्साहनच दिले. आज तेच प्रोत्साहन संचेताच्या कामी आलं आहे. तिला परीक्षेत ४९३ आणि इंटरमिजिएटचे ७ असे एकुण ५०० पैकी ५०० गुण मिळालेत. आज संचेता गुरुकुलची टॉपर बनलीय. तिची धाकड़ी बहीण सहावीला असून तिचा अभ्यास घेण्याची जबाबदारी संचेतानं स्वतःहून स्वीकारलीय. अभ्यासासाठी शाळाप्रमुख राजेंद्र चोरगे, मुख्याध्यापिका शिला वेल्हाळ यांचं मार्गदर्शन लाभल्याचं ती सांगते पण श्रेय देते ती आपले आई-पप्पा आणि वर्गशिक्षिका मृणालिनी अलगुडे यांना देते.
संचेताचं हे यश एका शाळेपुरतं, जिल्हा-राज्यापुरतं सीमीत नसून देशरक्षणार्थ छातीची ढाल करून उभ्या असलेल्या समस्त सैन्यासाठी अभिमानास्पद आहे. 'पुढ काय होणार?' यावर ती म्हणाली, 'नाय आताच सांगणार नाय. मी ठरवलंय ते झाल्यावर सगिन' या विलक्षण उत्तरानंतर आम्ही फक्त शाब्बास म्हणालो खरे..... पण लहानपणी सोफिया कुरेशी अशा असतील जन् भविष्यात योमिका सिंग कशा घडणार आहेत याची झलक तिनं एका वाक्यात करून दिली.