For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्षयरोग निर्मूलनासाठी शंभर दिवसांची तपासणी मोहीम

12:35 PM Dec 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्षयरोग निर्मूलनासाठी शंभर दिवसांची तपासणी मोहीम
Advertisement

क्षयरोग उच्चाटनात सहकार्य करण्याचे आवाहन

Advertisement

पणजी : राज्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आरोग्य सेवा संचालनालयाने 100 दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्यभरातील क्षयरोग ऊग्णांचे निदान आणि उपचार करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात येणार आहे. नूतन वर्ष 2025 पर्यंत देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. त्याच्या पूर्ततेसाठी राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी बाधित व्यक्तींना स्वेच्छेने टीबी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यायोगे लवकर निदान आणि उपचार सुनिश्चित करणे शक्य होणार आहे. 2024 मध्ये नोव्हेंबरपर्यंत राज्यात क्षयरोगाच्या 1,903 नवीन ऊग्णांची नोंद झाली आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये रोगाचे निदान झाल्यास तो त्वरित उपचार घेऊ शकतो व पूर्णपणे बराही होऊ शकतो.

त्यासाठीच ही 100 दिवसांची मोहीम प्रारंभ केली आहे. त्याअंतर्गत लोकांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन खात्यातील वरिष्ठ क्षयरोग अधिकाऱ्याने केले आहे. राज्यात दरवर्षी सरकारी आणि खाजगी ऊग्णालयांमध्ये मिळून सरासरी 2,000 नवीन टीबी ऊग्णांची नोंद होते. अशावेळी प्रत्येक जिह्यात नियमित तपासणी, निदान उपक्रम राबविल्यास वाढीव प्रकरणे शोधणे आणि त्यांच्यावर वेळीच उपचारांच्यादृष्टीने लक्ष केंद्रित केल्यास ही संख्या नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे. क्षयरोगाचे वेळीच निदान आणि संपूर्ण उपचार यांच्या महत्त्वाबाबत समाजात वाढलेल्या जागरूकतेमुळे क्षयऊग्णांचा लवकर शोध घेणे तसेच विविध उपचारपद्धती आणि प्रगत साधनांच्या माध्यमातून ऊग्णाला पूर्ण बरा करण्यात यश प्राप्त होऊ शकते, असे सदर अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.