महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अपघातप्रवण क्षेत्रांच्या दुरुस्तीस केंद्राकडून 100 कोटी मिळणार

12:40 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची तयारी

Advertisement

पणजी : राज्यात सुमारे 60 अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) शोधून काढण्यात आली असून त्यापैकी 30 क्षेत्रांचा दुऊस्ती आराखडा सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केला आहे. काही अपघात ठिकाणे राष्ट्रीय महामार्गावर तर काही राज्य महामार्गावर असून काही अंतर्गत रस्त्यांवर तसेच गावातील रस्त्यांवर सापडली आहेत. आणखी अपघातप्रवण क्षेत्रे शोधण्याची प्रक्रिया चालू आहे. सध्या तरी 60 ठिकाणे ओळखून त्यांची नोंद करण्यात आली आहे. ही ठिकाणे दुऊस्त करण्यासाठी राज्य सरकारने निधीची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी ऊ. 100 कोटी देण्याची तयारी नुकत्याच गोवा भेटीत दर्शवली आहे. त्यामुळे ती ठिकाणे यापुढे दुऊस्त होतील आणि वाढते अपघात टळतील अशी अपेक्षा आहे. अपघातांच्या ठिकाणांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या 30 ठिकाणांच्या दुऊस्तीचे नियोजन करण्यात आले असून निधी उपलब्ध झाल्यानंतर ते काम सुऊ होईल, असे सांगण्यात आले. निधी मिळाल्यानंतरच दुऊस्तीचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी भूसंपादन करणे हा मोठा अडथळा बनला असून ती ठिकाणे काढून रस्ता सरळ करण्यासाठी लोक सहसा जमीन देण्यास तयार नसतात किंवा तेथील भूसंपादनास विरोध करतात. त्यामुळे त्यांची दुऊस्ती लवकर होत नाही व त्यास विलंब होतो.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article