सरकारचे 100 कोटी कर्जरोखे विक्रीस
प्रतिनिधी/ पणजी
राज्य सरकारने 100 कोटी दर्शनी मूल्याचे कर्जरोखे विक्रीस काढले असून सोमवार दि. 13 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) प्रणालीवर लिलाव होणार आहे.
प्रत्येक स्टॉकच्या विक्रीच्या अधिसूचित रकमेच्या दहा टक्क्यांपर्यंतचा सरकारी साठा पात्र व्यक्ती आणि संस्थांना वाटप करण्यात येईल. बिगर स्पर्धात्मक बोली सुविधेसाठी वैयक्तिक गुंतवणूकदार देखील बोली लावू शकतात.
लिलावासाठी स्पर्धात्मक आणि बिगर-स्पर्धात्मक अशा दोन्ही बोली 13 नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेच्या कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर केल्या पाहिजेत. स्पर्धात्मक बोली सकाळी 10.30 ते 11.30 च्या दरम्यान सादर कराव्या. तर बिगर-स्पर्धात्मक बोली सकाळी 10.30 ते 11.00 च्या दरम्यान सादर कराव्या लागणार आहेत.
लिलावाचे निकाल दि. 13 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील आणि यशस्वी बोलीदारांकडून 15 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आरबीआयच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयात बँकिंग वेळेत पैसे भरले जातील.