महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2030 पर्यंत रशियासोबत 100 अब्ज डॉलर्सचा व्यापार

06:19 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आंतर-सरकारी आयोगाच्या बैठकीत जयशंकर यांचे वक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारत आणि रशियादरम्यान व्यापार, अर्थव्यवस्था, वैज्ञानिक तंत्रज्ञान प्रकरणांसाठीच्या आंतर-सरकारी आयोगाची 25 वी बैठक नवी दिल्लीत आयोजित झाली आहे. या बैठकीत भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी केले. तर रशियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व प्रथम उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांनी केले. भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार 2030 पर्यंत वाढून 100 अब्ज डॉलर्सवर पोहोचणार असल्याचे बैठकीदरम्यान जयशंकर यांनी म्हटले आहे.

दोन्ही देशांमधील व्यापारात काही आव्हाने आहेत, ज्यात खासकरून देयक आणि पुरवठ्याशी संबंधित आहेत. या प्रकरणी बरीच पावले उचलण्यात आली असली तरीही अद्याप खूप काही करावे लागणार आहे. संपर्कव्यवस्थेच्या सबंधी आमचे संयुक्त प्रयत्न म्हणजेच उत्तर-दक्षिण परिवहन मार्गिका, चेन्नई-व्लादिवोस्तोक कॉरिडॉर अणि नॉर्दर्न सी रुटचे काम पुढे नेण्याची गरज असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

बैठकीत अन्नसुरक्षा आणि आरोग्यसुरक्षेच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. रशिया भारतासाठी खते, कच्चे तेल, कोळसा आणि युरेनियमचा मुख्य स्रोत ठरला आहे. तसेच भारताचा औषध उद्योगही रशियासाठी स्वस्त आणि विश्वसनीय स्रोत ठरला आहे. दोन्ही देशांमधील व्यापार 2030 पर्यंत किंवा त्यापूर्वीच 100 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य प्राप्त करेल असा विश्वास असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.

मुक्त व्यापार करार

मागील 5 वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापाराचे प्रमाण 5 पटीपेक्षा अधिक वाढले आहे. भारत आता रशियाच्या सर्व विदेशी आर्थिक भागीदारांमध्ये दुसरा सर्वात महत्त्वाचा देश आहे. आम्ही ईईयू आणि भारतादरम्यान मुख्य व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यासोबत सेवा आणि गुंतवणुकीवर द्विपक्षीय करार करण्यावरून प्रतिबद्ध आहोत असे रशियाचे प्रथम उपपंतप्रधना डेनिस मंटुरोव्ह यांनी बैठकीत म्हटले आहे.

रशियन आणि भारतीय बँकांदरम्यान समन्वयाच्या विस्ताराचे काम जारी ठेवणार आहोत. दोन्ही देशांदरम्यान थेट हवाई वाहतुकीचा विस्तार करण्यातही आमची रुची आहे. सध्या केवळ रशियन एअरलाइन्स एरोफ्लोटकडूनच दोन्ही देशांदरम्यान उ•ाणे संचालित केली जातात. भारतीय एअरलाइन्स देखील रशियासाठी उ•ाणे सुरू करतील अशी अपेक्षा आहे. आण्विक क्षेत्रात महत्त्वपूर्ण सहकार्याचा विस्तार करण्यासाठीही आम्ही इच्छुक आहोत. मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारतीय रेल्वेसाठी हायस्पीड इलेक्ट्रिक रेल्वेंच्या संयुक्त उत्पादनावरही आम्ही काम करत आहोत असे मंटुरोव्ह यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article