Kagal News | कागलमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; घरात झोपलेल्या १० वर्षांच्या चिमुरड्याचा अंगावर नारळाचा बुंधा पडल्याने दुर्दैवी मृत्यू
04:32 PM Jun 24, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
कागल : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथे नारळाच्या झाडाचा तुटलेला बुंधा अंगावर पडल्याने १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष अक्षय चौगुले (वय १०, रा. सिद्धनेर्ली, ता. कागल) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत कागल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि . २४ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आयुष हा आपल्या आईसोबत घरात झोपला होता. यावेळी घराशेजारील नारळाच्या झाडाचा तुटलेला बुंधा त्याच्या अंगावर पडला. गंभीर जखमी झालेल्या आयुषला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कागल येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी लखन बाळू सकटे (वय ३२, रा. सिद्धनेर्ली) यांनी दिलेल्या वर्दीवरून कागल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. जाधव करीत आहेत.
Advertisement
Advertisement