For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वंशज शर्माचे 10 बळी

06:36 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
वंशज शर्माचे 10 बळी
Advertisement

वृत्तसंस्था/ तुथीपेठ

Advertisement

2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील ड गटातील येथे रविवारी झालेल्या सामन्यात जम्मू-काश्मिरने पुडूचेरीचा 19 धावांनी पराभव केला. या सामन्यात जम्मू-काश्मिरचा डावखुरा फिरकी गोलंदाज वंशज शर्माने रणजी पदार्पणातच 10 गडी बाद केले. या सामन्यात जम्मू-काश्मिरने पहिल्या डावात 106 धावा जमविल्यानंतर पुडूचेरीचा पहिला डाव 172 धावांवर आटोपला. पुडूचेरीने 66 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. त्यानंतर जम्मू-काश्मिरने दुसऱ्या डावात 152 धावा जमविल्या. पुडूचेरीचा दुसरा डाव केवळ 35.3 षटकात 67 धावात आटोपल्याने जम्मू-काश्मिरने हा सामना 19 धावांनी जिंकला. वंशज शर्माने 16 धावात 5 गडी बाद केले होते. या सामन्यात शर्माने 74 धावात 5 बळी मिळविले होते. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मिरच्या अबिद मुस्ताकने पुडूचेरीच्या दुसऱ्या डावात 28 धावात 5 गडी बाद केले. या स्पर्धेत आता जम्मू काश्मिर संघाने आपली अपराजित घोडदौड कायम राखली असून ते 18 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहेत. बडोदा आणि मध्यप्रदेश हे या गटात पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

संक्षिप्त धावफलक - जम्मू-काश्मिर प. डाव 106, पुडूचेरी 2. डाव 172, जम्मू-काश्मिर दु. डाव सर्व बाद 152, पुडूचेरी दु. डाव 35.3 षटकात सर्व बाद 67.

Advertisement

Advertisement
Tags :

.