For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिजिटल व्यवहारात यूपीआयची यशस्वी 10 वर्षे

06:45 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
डिजिटल व्यवहारात यूपीआयची यशस्वी 10 वर्षे
Advertisement

2016-17 मधील 2 कोटींवरुन 24,162 कोटींवर देवाणघेवाणीचे व्यवहार : मूल्य 314 लाख कोटी रुपयांवर

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालीत यूपीआयची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर हा सरळ, गतीने व अधिक सर्वसमावेशकपणे होत आहे. डिजिटल देवाणघेवाणीच्या व्यवहारात अग्रेसर असणाऱ्या यूपीआयला 25 ऑगस्ट रोजी 10 वर्षे यशस्वी पूर्ण झाली आहेत. 2016 मध्ये ही सेवा सुरु करण्यात आली होती. त्यानंतर सेवा जागतिक स्तरावर स्वत:ची ओळख अधिक गडद करु शकली. भारतात देवाणघेवाणीच्या व्यवहारांना बदलण्यात यूपीआयचा वाटा हा अत्यंत महत्त्वाचा ठरला.

Advertisement

मागे वळून पाहता 2016-17 मध्ये अंदाजे 2 कोटी इतके असणारे देवाणघेवाण व्यवहार 2025-26 मध्ये 24,162 कोटीपेक्षा अधिक झाले. याचदरम्यान देवाणघेवाणीचे मूल्य 0.07 लाख कोटींहून ते थेट 314 लाख कोटी रुपयांवर पोहचले. ही आकडेवारी म्हणजे केवळ तांत्रिक विकास नव्हे तर संपूर्ण भारतात डिजिटल देवाणघेवाणीत यूपीआयला वाढता प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होते. देशाच्या आर्थिक व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर सुखावह ठरला हे त्याने अधोरेखीत केले. सामान्य नागरिकांना छोट्या मूल्याचे व्यवहार ते मोठ्या व्यावसायिकांनीही व्यवहार यूपीआयद्वारे केलेले दिसून आले. हे व्यवहार करता यावेत म्हणून विविध बँकांनीही यूपीआय वापरकर्त्यांना आपली सेवा देशाच्या विविध भागात पोहचवण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

जुलै 2026 मधील व्यवहार

जुलै 2026 मध्ये पाहता यूपीआयमार्फत 2365.8 कोटी इतके देवाणघेवाणीचे व्यवहार झाले आहेत. ज्याचे मूल्य हे 29.87 लाख कोटी रुपयांवर पोहचते. 741 बँकांच्या मार्फत हे व्यवहार झाले आहेत. सुरुवातीला ही सेवा फक्त 21 बँका देत होत्या, आज ही संख्या 741 वर पोहचलीय.

यूपीआयची आंतरराष्ट्रीय ख्याती

भारतात तर यूपीआय प्रणाली लोकप्रिय झाली असून सर्वदूर पोहचली आहेच पण ही सेवा आता आंतरराष्ट्रीय व्याप्ती वाढवत आहे. ही सेवा सध्या 11 देश वापरत असल्याचे समजते. आंतरराष्ट्रीय नाणे निधी संघटनेने जागतिक स्तरावर यूपीआयला मान्यता देणे ही बाब आंतरराष्ट्रीय स्तरावर यूपीआय सेवेला विस्तार करण्यासाठी बळ देणारी ठरली.

सुरक्षित सेवा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार डिजिटल देवाणघेवाण  व्यवहारांना अधिक मजबूती मिळवून देत आहे. सायबर सुरक्षा, फसवणूकीला चाप, ग्राहक जागरुकता, डेटा सुरक्षा व सिस्टम किंवा प्रणालीला मजबूती देण्यासारख्या मुद्यांवर लक्ष दिले जात आहे. यूपीआयचा प्लॅटफॉर्म नागरिकांना वापरण्यासाठी अधिक सुरक्षित, विश्वासू व सुविधायुक्त राहील यावर अधिकचा भर दिला गेला आहे.

Advertisement
Tags :

.