For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरियाणामध्ये सरकारी नोकरीत अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण 

06:43 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरियाणामध्ये सरकारी नोकरीत अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण 
Advertisement

मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचा मोठा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगढ

हरियाणात सरकारी भरतीमध्ये अग्निवीर जवानांना आरक्षण दिले जाणार आहे. बुधवारी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी राज्यातील अग्निवीरांना लाभ देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. भारतीय सैन्यात अग्निवीर झालेल्या तऊणांना हरियाणातील सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्क्मयांपर्यंत आरक्षणाचा लाभ दिला जाईल. तसेच राज्य सरकारच्या गट क भरतीमध्ये 5 टक्के आरक्षण दिले जाईल, असा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे.

Advertisement

मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी राज्यातील सरकारी नोकऱ्यांबाबत बुधवारी महत्त्वाचे निर्णय जारी केले. अग्निवीरांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जासह इतर घोषणा करण्यात आल्या. हरियाणा पोलीस कॉन्स्टेबल, मायनिंग गार्ड, वनरक्षक, कारागृह वॉर्डन, एसपीओ यांसारख्या नोकऱ्यांमध्ये अग्निवीरला 10 टक्के आरक्षण दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

गट ब आणि क मधील सरकारी पदांसाठी कमाल वय 3 वर्षांची सूट दिली जाईल, परंतु अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या बाबतीत ही सवलत 5 वर्षे असेल. गट क मधील नागरी पदांवर थेट भरतीमध्ये अग्निशमन दलासाठी 5 टक्के आरक्षण आणि गट ब मध्ये 1 टक्के आरक्षण दिले जाईल, असेही सांगण्यात आले.

कोणत्याही औद्योगिक युनिटने अग्निवीरला दरमहा 30 हजार ऊपयांपेक्षा जास्त पगार दिल्यास आमचे सरकार त्या औद्योगिक युनिटला वार्षिक 60 हजार ऊपये अनुदान देईल. कोणत्याही अग्निवीरला स्वत:चा उद्योग सुरू करायचा असेल तर सरकार 5 लाख ऊपयांच्या कर्जावरील व्याज माफ करेल, अशी घोषणाही राज्य सरकारने केली आहे.

Advertisement
Tags :

.