For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टपाल कार्यालयात 10 लाख ऊपयांची अफरातफर

07:55 AM Apr 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
टपाल कार्यालयात 10 लाख ऊपयांची अफरातफर
Advertisement

पोस्टल तिकीट विक्री केलेल्या पैशांचा घोटाळा

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

पणजी : येथील मुख्य टपाल कार्यालयात 10 लाख 98 हजार 785 ऊपयांची अफरातफर झाल्याची घटना घडली आहे. याबाबत उप पोस्टमास्टर मनीषा झागडे यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयिताच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 316(5) अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला समन्स बजावण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी प्रवीण तेजराव लहाने असे असून तो मूळचा बुलढाणा-महाराष्ट्र येथील असून आल्त -पर्वरी येथे राहतो, तर मुख्य टपाल कार्यालयात तो सहाय्यक कोषाध्यक्ष म्हणून काम करीत होता. जनतेला आणि सरकारी कार्यालयांना शासकीय टपाल तिकीट उपलब्ध करून विकण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले होते. 25 जानेवारी 2025 ते 23 मार्च 2026 या काळात त्याने  विकलेल्या आणि पोस्ट केलेल्या तिकीटांचा हिशेब, नोंदवहीत नोंद केला नाही, तसेच संगणकावरही नोंद केली नाही, ज्यामुळे शासकीय निधीचे नुकसान झाले. सुमारे 10 लाख 98 हजार 785 ऊपयांची अफरातफर करून, त्याने स्वत:च्या वापरासाठी निधीचा गैरवापर केला आणि शासकीय कर्मचारी असताना हे कृत्य त्याने केले आहे.

पणजी पोलिस स्थानकाचे पीएसआय नितीन नाईक यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.