For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

365 दिवसांत एआयचे 10 लाख ‘धुरंधर’

06:54 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
365 दिवसांत एआयचे 10 लाख ‘धुरंधर’
Advertisement

माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा :

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

भारताने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सला (एआय) सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजस्थानातून एक मेगा स्किलिंग अभियानाची सुरवात केली असून याचे उद्दिष्ट केवळ एका वर्षात देशाच्या 10 लाख युवांना एआय कौशल्य प्रदान करणे आहे. हा कार्यक्रम युवांना रोजगारक्षम करण्यासोबत छोट्या व्यवसायांमध्ये उत्पादकता वाढविणे आणि दैनंदिन जीवनात एआयच्या वापराला प्रोत्साहन देणारा आहे. वेगाने होत असलेल्या 5जी रोलआउटप्रमाणेच सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रतिभा विकास आणि एआय कौशल्य विकासाचे काम तितकेच वेगाने होणार असल्याचा दावा वैष्णव यांनी केला आहे.

Advertisement

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग ठरला असून आता त्याचप्रकारे कॉम्प्युटर, सेमीकंडक्टर, इंटरनेट आणि मोबाइल फोनद्वारे संचालित मागील तंत्रज्ञान क्रांती होत्या. एआय एकसमान निकषांच्या परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करते आणि याची भविष्यातील भूमिकेची तुलना विजेशी केली जाऊ शकते असे उद्गार केंद्रीय मंत्र्यांनी काढले आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सर्वव्यापी होणार असून प्रत्येक व्यक्ती, घर आणि इमारतीपर्यंत पोहोचणार आहे. या तांत्रिक बदलाला स्वीकारले गेले पाहिजे आणि याला दैनंदिन जीवनात एकीकृत करण्यात यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एआयसंबंधी स्पष्ट दृष्टीकोन असून तो समाजाच्या व्यापक हितासाठी एआयच्या वापरावर केंद्रीत आहे. या दृष्टीकोनाचा पहिला मार्गदर्शक सिद्धांत एआयचे लोकशाहीकरण आहे, प्रत्येक नागरिकाला तंत्रज्ञानापर्यंत पोहोचता यावे आणि याच्या वापराच्या समान संधी प्राप्त व्हाव्यात हे सुनिश्चित करणे असल्याचे उद्गार वैष्णव यांनी काढले आहेत.

भारताची एआय मिशन

भारताच्या एआय मिशनला जागतिक मान्यता मिळाली असून अनेक देश कृत्रिम बुद्धिमत्ताच्या लोकशाहीकरणाच्या भारताच्या मॉडेलचे बारकाईने अध्ययन करत आहेत. या मिशनचा प्रमुख स्तंभ किफायतशीर कॉम्प्युटिंग अवसंरचना उपलब्ध करविणे आहे. पंतप्रधान मोदींनी भारतात उच्चगुणवत्ता प्राप्त कॉम्प्युटिंग सुविधा अत्यंत कमी खर्चात उपलब्ध करविण्याचा विचार मांडला आहे. विद्यार्थी, स्टार्टप, युवा, वैज्ञानिक आणि इंजिनियर्स वित्तीय अडथळ्यांशिवाय जागतिक स्तरीय  कॉम्प्युटिंग साधनसामग्रीचा वापर करू शकतील हे सुनिश्चित करणे हा या पुढाकाराचा उद्देश असल्याचे वैष्णव म्हणाले.

ब्

Advertisement
Tags :

.