For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेक्सिकोत गोळीबारात एका मुलासह 10 ठार

06:27 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेक्सिकोत गोळीबारात एका मुलासह 10 ठार
Advertisement

मेक्सिको सिटी :

Advertisement

मेक्सिकोच्या प्युएब्ला राज्यात झालेल्या भीषण गोळीबाराने संपूर्ण प्रदेश हादरला आहे. तेहुइत्झिंगो शहरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करून 10 जणांना ठार केले. मृतांमध्ये महिलांसह एका निष्पाप मुलाचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. प्युएब्लाच्या सार्वजनिक सुरक्षा संस्थेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, मृतांमध्ये 6 पुरुष, 3 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप कळलेले नाही, परंतु स्थानिक सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संघीय अधिकारी सध्या सखोल तपास करत असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

या हत्याकांडानंतर प्युएब्ला राज्यात दहशतीचे वातावरण वाढले आहे. स्थानिकांना आपला जीव वाचवण्यासाठी घरे सोडून पळत आहेत. मध्य मेक्सिकोमध्ये सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाच्या संघर्षात अचानक वाढ झाली आहे. वाढत्या दहशतीमुळे आणि असुरक्षिततेमुळे अंदाजे 800 ते 1000 कुटुंबांना आपली वडिलोपार्जित घरे सोडून सुरक्षित ठिकाणी पलायन करण्यास भाग पडले आहे.

Advertisement

Advertisement

.