For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टॅक्सी दरीत कोसळून जम्मूत 10 जण ठार

06:17 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
टॅक्सी दरीत कोसळून जम्मूत 10 जण ठार
Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मूहून श्रीनगरला जाणारी एक प्रवासी पॅब (एसयूव्ही) खोल दरीत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबन जिह्यात ही दुर्घटना घडली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, एसडीआरएफ आणि सिव्हिल क्मयूआरटी दलाने रामबन येथील घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू केले. बचावकार्याअंती सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सर्व प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पहाटे 1.15 च्या सुमारास जिह्यातील बॅटरी चष्मा भागात 300 फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. मृतांपैकी बलवान सिंग (47) हा कारचालक जम्मूमधील असून उर्वरित सर्व प्रवासी बिहारमधील पश्चिम चंपारण येथील असल्याचे सांगण्यात आले.

जम्मू-काश्मीरमधील रामबन येथे झालेल्या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख ऊपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.