For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियाच्या सैन्यातील 10 भारतीय लवकरच परतणार

06:34 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
रशियाच्या सैन्यातील 10 भारतीय लवकरच परतणार
Advertisement

केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रशियाच्या सैन्यात काम करत असलेले 10 भारतीय नागरिक लवकरच मायदेशी परतणार असल्याची माहिती केंद्रीय विदेश राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी सप खासदार धर्मेंद्र यादव यांच्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली आहे. रशियाच्या सैन्यात कमा करत असलेल्या 10 भारतीयांना रशियाच्या सशस्त्र दलांनी सेवेतून मुक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement

युक्रेनच्या युद्धक्षेत्रात मानवतस्करीद्वारे नेण्यात आलेल्या भारतीयांचा तपशील उपलब्ध करण्याची मागणी खासदार यादव यांनी केली होती. तसेच सरकारने या भारतीयांना परत आणण्यासाठी कुठली पावले उचलली आहेत का असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.

रशियाच्या सशस्त्र दलांमध्ये भरती काही भारतीय नागरिकांना  लवकरच मायदेशी परत आणले जाणार आहे. विदेश मंत्रालय तसेच मॉस्को येथील भारतीय दूतावासाने यासंबंधी रशियाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रभावीपणे भूमिका मांडली आहे. आतापर्यंत रशियाच्या सशस्त्र दलांनी सुमारे 10 भारतीयांना सोडले असल्याचे कीर्तिवर्धन सिंह यांनी सांगितले आहे.

8-9 जुलै रोजीच्या रशियाच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियन सशस्त्र दलांमध्ये भरती करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी परत पाठविण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच विदेश मंत्रालयाने सर्व  भारतीय नागरिकांना रशियात रोजगाराच्या संधी शोधणे तसेच या युद्धक्षेत्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. रशियन सशस्त्र दलांमध्ये भरती करण्याकरता भारतीय नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.