For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण गोव्यात बीएसएनएल केबल चोरीप्रकरणी चोवीस तासांत 10 एफआयआर; अडीच लाखांचे नुकसान

02:05 PM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण गोव्यात बीएसएनएल केबल चोरीप्रकरणी चोवीस तासांत 10 एफआयआर  अडीच लाखांचे नुकसान
Advertisement

मडगाव: बीएसएनएलच्या साहित्य चोरीप्रकरणी दक्षिण गोवा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 5 पोलिस ठाण्यांमध्ये 10 स्वतंत्र एफआयआर दाखल केले आहेत. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली

Advertisement

या प्रकरणांमध्ये भूमिगत कॉपर केबल, ऑप्टिकल फायबर लिंक, 4G उपकरणे, पिलर टॅग ब्लॉक आणि वितरण मॉड्यूल्स यांसारख्या दूरसंचार साहित्याची चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या चोरीच्या घटनांमुळे बीएसएनएलच्या दूरसंचार सेवांवरही परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीएसएनएलच्या प्राथमिक अंदाजानुसार, या घटनांमुळे सुमारे 2.5 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच दक्षिण गोव्यातील विविध भागांमध्ये दूरसंचार सेवा विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

सलग झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी प्रकरणांची नोंद करून तपास सुरू केला आहे. चोरीला गेलेले साहित्य, घटनांमागील व्यक्ती तसेच या प्रकरणांमध्ये परस्पर संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Advertisement

.