10 कंपन्या समभागधारकांना देणार लाभांश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
9 जूनपासून सुरु होणारा आठवडा हा भारतीय शेअरबाजारासाठी महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यामध्ये टाटा समूह आणि अदानी समूह यांच्या एकूण दहा कंपन्या आपल्या समभागधारकांना लाभांशांचे वितरण करणार आहे.
सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षेसंदर्भातील काम पाहणारी नेल्कोने 9 जून रोजी प्रति समभाग 1 रुपया लाभांश दिला आहे. या संदर्भातली घोषणा कंपनीने 24 एप्रिल रोजी केली होती. तर दुसरीकडे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन 10 जून रोजी प्रति समभाग 27 रुपये लाभांश देणार आहे. टाटा एलेक्सी 11 जून रोजी प्रति समभाग 75 रुपयांचा लाभांश देणार आहे तर रसायन उद्योगामध्ये असणाऱ्या टाटा केमिकल्सकडून 12 जून रोजी 11 रुपये प्रति समभाग लाभांश दिला जाणार आहे. याच दिवशी ट्रेंट यांच्याकडून 5रुपये प्रति समभाग लाभांश दिला जाणार आहे.
अदानी समूहातील कंपन्या
अदानी समूहामध्ये पाहता एसीसी, अदानी एंटरप्राईजेस, अदानी पोर्टस, अंबुजा सिमेंट आणि अदानी टोटल गॅस हे आपला लाभांश ग्राहकांना मिळवून देणार आहेत. एसीसी 7.5 रुपये, अदानी एंटरप्राइजेस 1.3 रुपये, अदानी पोर्ट प्रति समभाग 7 रुपये लाभांश देणार आहे. अंबुजा सिमेंट्स प्रति समभाग 2 रुपये आणि सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशनचे काम पाहणारी अदानी टोटल गॅस प्रति समभाग 0.25 रुपये लाभांश देणार आहे.